कारखानदारीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर राजकारणासाठी पैसा उपलब्ध होतोय ; पवार साहेबांच उसाला आळशी पीक म्हणणं दुर्दैवी : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘बळीराजा हुंकार’ यात्रेला प्रारंभ केला आहे. आजपासून पुढील तीन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यभर त्यांनी बळीराजा हुंकार यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याला आळशी पीक म्हटलंय,त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीनी नाराजी व्यक्त केली आहे. उसाला आळशी शेतकऱ्याच पीक म्हणणं चुकीचंय..असं त्यांनी म्हंटले आहे.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले ,”ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच उत्पादन घेण्यासाठी काय काय करावं लागत हे पवार साहेबांना अजून माहिती नाही,18 महिने ऊसाची जोपासना तळ हातांच्या फोडाप्रमाणे करावी लागते,उसाच्या लागणी पूर्वी तीन महिने मशागत, पूर्वमशागत, हिरवळीच्या खताच नियोजन,रात्री – अपरात्री पाण्यासाठी शेतात जाण,रासायनिक खत फवारण,भांगलणे करण,बरणी, साऱ्या सोडण,वाकूडी मारण,कारखान्यात नोंदीसाठी चिटबॉय – संचालक मंडळाच्या माग हिंडण,उसाच्या तोडीसाठी हातापाया पडणं,त्यांना ढाब्यावर नेऊन पार्ट्या देण,ऊस कारखान्याला गेल्यानंतर त्याची एफआरपी मिळवण्यासाठी आंदोलन करण,मोर्चे काढणं, पोलिसांच्या लाट्याकाट्या खाण,केसेस अंगावर घेणं,कोर्टाचे हेलपाटे करण हे सगळं ऊस उत्पादक शेतकऱ्याला करावं लागत.त्यामुळे उसाला आळशी शेतकऱ्याच पीक म्हणणं चुकीचंय..

कारखानदारीच्या भष्टाचारावर राजकारणासाठी पैसा उपलब्ध होतोय

पुढे बोलताना ते म्हणाले , या उलट याचं आळशी लोकांच्या जीवावर आज महाराष्ट्रातली कारखानदारी उभी राहिलेली आहे.या महाराष्ट्रातल्या कारखानदारीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर राजकारणासाठी पैसा उपलब्ध होतोय..तर जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे करून जे लोक बांडगुळासारखं वाढतायत त्यांचा मूळ पोशिंदा हा ऊस उत्पादक शेतकरीच आहे त्याला आळशी म्हणणं ही अतिशय दुर्दैवाची आहे.आणि शेतकऱ्याला हे पसंत पडलेल नाहीये.”

पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “शरद पवार साहेब हे 10 वर्ष कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना सर्वात जास्त शेतीमधलं कळत..पण त्यांच्या एक गोष्ट ध्यानात यायला पाहीजे की, ऊस हे असं एकमेव पीक आहे ज्याला हमीभावाचं कायदेशीररीत्या संरक्षण आहे. बाकीच्या पिकांचा हमीभाव हा कागदावर राहतो, प्रत्यक्षात बाजारामध्ये हमीभावपेक्षा कमी किंमतीने शेती माल विकावा लागतो, इतर पिकांच्या तुलनेमध्ये उसला कमी फायदा होतो,पण तो शाश्वत फायदा होतो, मात्र आर्थिक सुरक्षितातेमूळ, दराच्या निश्चिततेमुळे शेतकरी उसाकडे वळतो.”राजू शेट्टी हे आजपासून पुढील तीन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यभर त्यांनी बळीराजा हुंकार यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!