Monsoon Alert: गुजरात, महाराष्ट्र, गोवा येथे अतिवृष्टीचा इशारा; 7 राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी!

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने (Monsoon Alert) आज आणि उद्या 26 जुलै रोजी गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा सोबत रेड अलर्ट जरी केलेला आहे. दिलेला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि ओडिशामध्ये या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट (Monsoon Alert) जारी करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 26 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 27 जुलैपर्यंत आसाम आणि मेघालयात मुसळधार पावसाचा अंदाज (Monsoon Alert) वर्तवला आहे.

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ कायम (Maharashtra Monsoon)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांना पावसाचा मोठा फटका बसला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा (Monsoon Alert) देण्यात आला आहे.

येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात (Pune Weather) पावसाचा रेड अलर्ट (Monsoon Alert) देण्यात आल्याने शाळा, ऑफिसेस आज 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

आज कोकणातील (Konkan Monsoon) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत (Mumbai Rain) पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान ढगाळ राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे.

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील 24 तासांसाठी हाय अलर्ट (Monsoon Alert) जारी करण्यात आला आहे.