PM Kisan : 9000 हून अधिक मृत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले PM किसान योजनेचे पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) राबवली आहे. ज्या अंतर्गत लागवडीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. मात्र अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेताना दिसून आले. यासंदर्भांत आता एक नवी माहिती समोर आली असून तब्बल 9,000 पेक्षा अधिक मृत शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसनाची रक्कम जमा झाली आहे.

एका नवीन अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील 9,000 हून अधिक मृत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळाली आहे. जेव्हा उत्तर प्रदेश सरकारने कृषी विभागाला लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी करण्यास सांगितले तेव्हा यातील त्रुटी लक्षात आली. “तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या” या अंतर्गत दाखवले की PM किसानचे पैसे किमान 9,284 मृत शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले गेले. याप्रकरणी एका अधिकाऱ्याने शुक्रवारी (PM Kisan) सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि कुटुंबांना वसुलीच्या नोटिसाही पाठवल्या जात आहेत.

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे वसूल केले जातील

याबाबत माहिती देताना फिरोजाबाद जिल्हा कृषी अधिकारी हरनाथ सिंह म्हणाले की, या योजनेत नोंदणीकृत शेतकरी सुमारे ९६,००० असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, महसूल विभागाची पथकेही मृत शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात गुंतलेली आहे. त्यांची ओळख पटताच यादीतून त्यांची नावे काढून टाकली जातील आणि ज्या कुटुंबांना या योजनेतून चुकीच्या पद्धतीने पैसे (PM Kisan) मिळाले आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील.

पीएम किसान 12 व्या हप्त्याची तारीख

12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच ऑगस्ट महिन्यात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता दिला जाऊ शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!