लंपीमुळे आत्तापर्यंत दीड लाखाहून अधिक जनावरांचा मृत्यू, तर 6.50 कोटी जनावरांना लसीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी स्कीन रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशातील पशुपालक चिंतेत आहेत. याचा मोठा फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. आत्तापर्यंत लम्पी स्कीनच्या आजारामुळं देशात 1 लाख 55 हजार 724 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्ध मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत देशात 29 लाख 52 हजार 223 जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.

आत्तापर्यंत 6.50 कोटी गायींना लसीकरण

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 6.50 कोटी गायींना लसीकरण केले आहे. आणखी 9 कोटी जनावरांना लसीकरण करणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. साडेपाच कोटीहून अधिक दुभत्या गायींची संख्या आहे. तर रस्त्यावर फिरणाऱ्या गायींची संख्या देखील लक्षणीय आहे. 50 लाखांच्या आसपास रस्त्यावर फिरणाऱ्या गायी आहेत. सध्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनावरांना लसीकरण सुरु आहे. लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनं केलं आहे.

कोणत्या राज्यात किती झालं लसीकरण

छत्तीसगड मध्ये 19.15 लाख लसीकरण तर अद्याप 25 लाख बाकी, गुजरात मध्ये लसीकरण 63.19 लाख तर अद्याप बाकी. तर महाराष्ट्रात 1 कोटी 31 लाख लसीकरण पूर्ण झाले असून अद्याप 1 कोटी 50 लाख लसीकरण बाकी आहे. तर पंजाब मध्ये 9.21 लाख लसीकरण पूर्ण झाले असून अद्याप 25 लाख जनावरांचे लसीकरण बाकी आहे.

error: Content is protected !!