हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या मृग बहार डाळिंब पिकात (Mrug Bahar Pomegranate Management) फळवाढ (Fruit Growth) आणि पक्वता अवस्था सुरु आहे. मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे डाळिंब बागांमध्ये (Pomegranate Crop) काय व्यवस्थापन करावे याविषयी जाणून घेऊ या.
बागेची मशागत (Cultivation Of Pomegranate Orchard)
- फळबागेतून पाण्याचा संपूर्ण निचरा करावा. पावसामुळे झाडांच्या मुळांच्या जवळ पाणी साचलेले नाही, याची काळजी घ्यावी. पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- फळांनी भरलेल्या फांद्यांना आधार देण्यासाठी योग्य प्रकारे स्टेकिंग (Staking) किंवा काठीचा आधार करावा.
- फळांची योग्य वाढ होण्यासाठी व चांगले वजन मिळवण्यासाठी गुच्छामधील जास्त आणि गरजेपेक्षा अधिक फळे काढावीत. पाच वर्षाच्या झाडासाठी प्रति झाड सुमारे 80 ते 100 फळे घ्यावीत.
- जास्त आर्द्रतेमुळे फळे गळण्याची (Pomegranate Fruit Drop) समस्या उद्भवू शकते. तसेच फळांची परिपक्वता होण्यासाठी आणि चांगला रंग येण्यास थोडा विलंब होऊ शकतो म्हणून पाण्याचे योग्य व्यवस्थापन (Mrug Bahar Pomegranate Management) करावे.
- लवकर मृग बहार घेतलेल्या बागेमध्ये फळ पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसित झाला असल्यास, फळगळ आणि बुरशीचे डाग टाळण्यासाठी वेळेत फळ तोडणी करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन: सध्याच्या अवस्थेत डाळिंब बागेत खालीलप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन (Pomegranate Nutrient Management) करावे.
- 0-52-34 (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) 6 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 15-20 दिवसांचा अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
- 6 ग्रॅम मँगनीज सल्फेट प्रति लिटर पाण्यात मिसळून 10-15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
- 0-52-34 (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) 5.12 किलो, यूरिया 12.56 किलो आणि 0-0-50 (पोटॅशियम सल्फेट) 4.6 किलो प्रति एकर याप्रमाणे आठवड्याच्या अंतराने दहा वेळा ड्रीपद्वारे द्यावे (Mrug Bahar Pomegranate Management).