हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत’ (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana) योजनेअंतर्गत साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ (Electricity Bill Waived) करण्यात आले आहे. यामुळे खेड तालुक्यातील (Khed Taluka) 19 हजार 539 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government Scheme) मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या योजनेद्वारे (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana) शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले आहे. या योजनेद्वारे राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. या योजनेचा लाभ खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना झाला असून तालुक्यातील 19 हजार 539 शेतकऱ्यांचे वीजबिल माफ झालेले आहे.
या योजनेचा (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana) सर्वाधिक लाभ चाकण, आळंदी, भोसरी आणि राजगुरुनगर या परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. या सर्व शेतकऱ्यांना मिळून सुमारे 14 कोटी 23 लाख रुपयांचे वीजबिल माफ (Electricity Bill Waived) झाले आहे. शेतकऱ्यांना आता शून्य वीजबिलाची प्रत मिळत असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत.
या योजनेद्वारे (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana) वीजबिल माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या (Maharashtra Farmers) खर्चात मोठी बचत झाली आहे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आहे, तसेच वीज बिलाच्या भारापासून मुक्तता मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर झाले आहेत.
शेतकऱ्यांनी या योजनेचे (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana) स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, वीजबिल माफ झाल्यामुळे त्यांच्यावरून एक मोठा भार कमी झाला आहे. आता ते अधिक उत्साहाने शेती करू शकतील. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील आणि शेती व्यवसाय (Agriculture) अधिक फायदेशीर होईल.