प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसोबत ‘या’ योजना पण आहेत लिंक; कागदपत्रांपासून मिळेल मुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । नुकतेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9.5 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. किसान सन्मान निधीचा हा आठवा हप्ता आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना शासनाकडून वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्यात येतात. हे पैसे एका वर्षामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये चार महिन्यांच्या कालावधीत दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.15 लाख कोटींपेक्षा जास्त मानधन शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ देणाऱ्या या सन्मान निधी योजनेबरोबर शासनाने इतर योजनाही जोडल्या आहेत.

अशा काही योजनांबद्दल आपण येथे जाणून घेऊ.

  • ही योजना पंतप्रधान किसान सन्मान निधीशी जोडल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा डॉक्युमेंटटेंशनपासून मुक्ती मिळते. किसान सन्मान निधीमध्ये नोंदणीच्या वेळी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात, त्यामुळे किसान मानधन योजनेचे पुन्हा कागदपत्र घेण्याची गरज नाही.
  • जनधन योजनेंतर्गत, 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी 60 वर्षाच्या वयानंतर दरमहा 3,000 रुपयांच्या पेन्शनचा अधिकार घेऊ शकतो. यासाठी शेतकऱ्याला 55 ते 200 रुपयांपर्यंतचे मासिक योगदान द्यावे लागेल. या योजनेंतर्गत आतापर्यंत 2127759 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे.
  • शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी, किसान क्रेडिट कार्ड योजना पंतप्रधान-किसान योजनेत समाविष्ट केली गेली आहे. यामुळे ज्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपयांचा हप्ता आहे अशा शेतकर्‍यांसाठी केसीसी तयार करणे सोपे आहे.
  • केसीसी योजनेंतर्गत 4% दराने शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. आतापर्यंत 1.82 कोटी शेतकर्‍यांना 1,63,627 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करते. याशिवाय वीज, पाणी अशा अनेक प्रकारच्या शेतीविषयक गरजांवर सरकार अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा देते.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/KzJiHgVregE3FOlwpDTyW6

Leave a Comment

error: Content is protected !!