Mung Variety : मुगाचे ‘फुले सुवर्ण’ नवीन वाण विकसित; एकाच वेळी शेंगा तोडणीला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामातील कमी कालावधीत येणारे पीक म्हणून मूग पिकाची (Mung Variety) ओळख आहे. काही शेतकरी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसावर मुगाची पेरणी करतात. तर काही शेतकरी हे मुगाचे बियाणे फोकून मुगाचे पीक घेतात. अगदी दोनच महिन्यात मुगाच्या शेंगा तोडणीला येतात. त्यानंतर मुगाचा पूर्ण बहार होईपर्यंत शेतकऱ्यांना या तोडत राहाव्या लागतात. मात्र आता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मुगाचे एक नाव वाण (Mung Variety) विकसित केले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एकाच तोड्यात मुगाच्या सर्व शेंगा तोडणीला येऊ शकणार आहे.

किती मिळते उत्पादन? (Mung Variety Fule Suvarna)

राहुरी कृषी विद्यापीठाच्या ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन वाणाचे नाव ‘फुले सुवर्ण’ आहे. या वाणाची विशेषतः म्हणजे ते भुरी रोगाला बळी पडत नाही. हे वाण जमिनीपासून पसरट न वाढता उभट पद्धतीने वाढते. ज्यामुळे शेंगांना माती लागून सडण्याचे प्रमाण हे अत्यल्प असते. या वाणाच्या सर्व शेंगा एकाच वेळी तोडणीला येतात. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर लागवड केल्यास या वाणाची काढणी ही मशीनद्वारे देखील करता येते. ज्यामुळे मनुष्यबळ वापरून शेंगा तोडण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना नसते. या वाणापासून खरीप हंगामात प्रति हेक्टरी सरासरी दहा क्विंटल उत्पादन मिळते. याशिवाय या वाणाची रब्बी हंगामात देखील लागवड केली जाऊ शकते. या वाणाद्वारे शेतकरी मुगाचे हेक्टरी उत्पादन वाढवू शकतात. याशिवाय सरकारच्या कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्णतेसाठी हे वाण महत्वाची भूमिका बजावू शकते. असेही विद्यापीठाने म्हटले आहे.

‘फुले सुवर्ण’ जातीची वैशिष्ट्ये

  • हे वाण भुरी रोगाला बळी पडत नाही.
  • हे वाण जमिनीपासून उंच वाढत असल्याने, शेंगा सडून नुकसान होत नाही.
  • पिकाच्या सर्व शेंगा एकाच वेळी तोडणीला येतात.
  • या वैशिष्ट्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची आवश्यकता पडत नाही.
  • मुगाचे पीक हे थेट मशीनद्वारे एकाच वेळी काढणी करता येते.
  • प्रति हेक्टरी दहा क्विंटल उत्पादन मिळते.
  • खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये लागवड केली जाऊ शकते.
  • या जातीच्या मुगाला अधिक मशागतीची गरज नसते.
error: Content is protected !!