हॅलो कृषी ऑनलाईन: मशरूमचे (Mushroom Training) आहारातील महत्व समजल्यामुळे मोठ्या प्रमाणात मशरुमचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी मशरूम उत्पादनाकडे (Mushroom Cultivation) वळले आहेत. परंतु अजूनही बऱ्याच जणाकडे जागेची उपलब्धता ही समस्या असल्यामुळे इच्छा असूनही मशरूम उत्पादन घेता येत नाही. मशरूम शेती करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी पुण्यातील कृषी महाविद्यालय (Agriculture College Pune) प्रशिक्षण घेऊन आले आहेत. या महाविद्यालयतर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये मुलांना कार्यनुभवावर आधारित शिक्षण दिले जाते. तसेच महाविद्यालयात मशरूम शेती कशी करावी (Mushroom Training), याबाबतचे मार्गदर्शनही मुलांना तसेच शेतकऱ्यांना केले जाते. याचे उत्पादन कसे केले जाते.
पुणे कृषी महाविद्यालयातर्फे अळंबीवर संशोधन (Mushroom Research) करून ते शेतकऱ्यांपर्यंत ट्रेनिंग, प्रदर्शन, मेळावे प्रकल्प भेट यामार्फत लागवड तंत्रज्ञान पोहचवले जाते.
तसेच मशरुमचे वेगवेगळे प्रकार, त्यांची वेगवेगळे लागवड तंत्रज्ञान कमी जागेत कमी खर्चात कसे करायचे याबाबत मार्गदर्शन (Mushroom Training) केले जाते.
कृषी महाविद्यालया अंतर्गत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी हे प्रशिक्षण (Mushroom Training) दिले जाते. यासाठी हजार रुपये इतके शुल्क आकारून हे प्रशिक्षण सकाळी 10 ते 5 या वेळात देण्यात येते.
त्याचप्रमाणे चतुर्थ वर्षातील शिकणाऱ्याला मुलांना मशरुमचे लागवड तंत्रज्ञान, मार्केटिंग बद्दलही (Mushroom Marketing) प्रशिक्षण दिले जाते. यामुळे भविष्यात त्यांना या प्रशिक्षणाचा फायदा करून आपला छोटा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांनी कृषी महाविद्यालय पुणे येथे संपर्क करावा.