Nagpuri Buffalo : या जातीची म्हैस देते 700 ते 1200 लिटर दूध; किंमत किती अन कुठे मिळेल ते पहा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात दुग्धव्यवसायाला हल्ली अधिकाधिक मागणी पहायला मिळते. काही गाय, म्हैस (Buffalo) या अंदाजे १०, १५ ते अधिकाधिक १७ लिटरपर्यंत दूध देताना दिसतात. मात्र राज्यात अशा काही म्हशी आहेत त्या ७०० ते १२०० लिटरपर्यंत दूध देतात. हे क्वचित ऐकायला मिळालं असलं तरीही हे खरे आहे. यामुळे शेती व्यवसायातील दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी अधिकाधिक श्रीमंत होतील.

नागपुरी जातीच्या म्हशीबद्दल आपण बोलत आहोत. नागपूरी ही एक म्हशींची विशिष्ठ जात आहे. ही जात नागपूर, अमरावती, अकोला येथे आढळते. राज्याबाहेर उत्तर भारत आणि आशिया खंडातही काही ठिकाणी आढळते. राज्यात तसेच देशात म्हशीचे पालन मोठया प्रमाणात होत आहे, अनेक भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी जोडव्यवसाय म्हणुन म्हशीच्या पालणाकडे बघत आहेत.

नागपुरी म्हशीच्या दुधात ७.७ % फॅट असते. तसेच गाईच्या दुधात ३.४ % फॅट असते. दुग्धोत्पादनासाठी नागपुरी म्हशींना मका, सोयाबीन, भुईमूग, उसाचे बगॅस, ओट्स, सलगम आणि कसावा सोबत गवत आणि भुसा दिला जातो. तसेच नागपूरी म्हशींचे रंगरूप हे खालीलप्रमाणे नमूद केले आहे.

नागपुरी म्हैस कशी दिसते?

१) नागपुरी म्हैस ही एका नजरेत ओळखता येते. इतर म्हशींपेक्षा ती खूप वेगळी असते. धष्टपुष्ट असते.
२) तिला तलवारीसारखी दोन शिंगे असतात. तसेच तिची मान खूपच लांब आहे.
३) या म्हशीची शेपटी हि आखूड असते.
४) रेड्याहूनही म्हशींची उंची ही कमी म्हणजेच १३४ आहे.
५) सर्वाधिक दूध देणाऱ्या जनावरांमध्ये नागपुरी म्हशीचं नाव अव्वल स्थानावर आहे.

error: Content is protected !!