Nano Tractor : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक तंत्रज्ञानाची गरज भासत असते. मात्र काही तंत्रज्ञानाच्या किमती मोठ्या असल्याने सगळे शेतकरी हे तंत्रज्ञान खरेदी करू शकत नाही. यामध्ये ट्रॅक्टर किंवा अन्य काही साधने येतात. आता गुजरात मधील एका शेतकऱ्याने एक अनोखा ट्रॅक्टर बनवला आहे. मंगल नॅनो ट्रॅक्टर असं या ट्रॅक्टरच नाव आहे. हा एक छोटा ट्रॅक्टर असून शेतकऱ्यांना शेती करताना याचा खूप उपयोग होत आहे. तसेच शेतकरी याला भाडेतत्त्वावर देखील देऊन चांगले पैसे कमवू शकतात. असे या ट्रॅक्टर बनवणाऱ्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. चलातर मग जाणून घेऊया त्या ट्रॅक्टर बद्दल अधिकची माहिती.

सर्वात कमी किंमतीत शेती उपकरणे विकत घेण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा
ज्या शेतकऱ्याने हा ट्रॅक्टर बनवला आहे त्या शेतकऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की, हा खूप मजबूत ट्रॅक्टर आहे. त्याचबरोबर या ट्रॅक्टरने शेती करताना काही अडचण निर्माण झाल्यास शेतकरी स्वतः देखील ही अडचण दूर करू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. या ट्रॅक्टरसाठी डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे. या ट्रॅक्टरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे याची चाके ही रबरची नसून ती लोखंडी चाके आहेत. शेतकऱ्यांना टायरमध्ये हवा भरायचा टेन्शन नाही आणि त्याची पंचर काढण्याच देखील टेन्शन नाही. त्यामुळे शेतकरी कुठेही हा ट्रॅक्टर शेतात फिरवू शकतात. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ट्रॅक्टर बनवले जात होते तेव्हा त्या ट्रॅक्टरला देखील लोखंडाचेच चाके होते त्यामुळे त्यांनी देखील या ट्रॅक्टरला लोखंडाची चाके जोडले असल्याचे सांगितले आहे. (Nano Tractor)
ट्रॅक्टरला डिझेल किती लागले?
या ट्रॅक्टरमध्ये एक बॉक्स देखील दिला आहे यामध्ये तुम्ही मोबाई, त्याचबरोबर पाणी बॉटल किंवा अन्य काही गोष्टी देखील ठेवू शकतात. या ट्रॅक्टरची खासियत म्हणजे हा ट्रॅक्टर दिवसभर आठ तास चालवला तरी याला फक्त अडीच लिटर डिझेल लागते. या ट्रॅक्टरची चार लिटर डिझेलची टाकी असून ती जर टाकी एकदा फुल केली तर शेतकरी दोन ते तीन दिवस आरामात शेतात ट्रॅक्टर चालू शकतात.
फ्रीमध्ये मिळणारं स्पेअर पार्ट
जर कोणत्या शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर त्यांनी केल्विन वडालीया यांच्याशी संपर्क साधावा. शेतकरी ११२५३७४३६६ किंवा ९८७९०२२७५० या नंबर वर संपर्क करून ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. यामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी एक ऑफर आहे जर शेतकऱ्यांनी हा ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर सहा महिन्याच्या आत याला काही प्रॉब्लेम आला तर यांच्याकडून फ्री मध्ये स्पेअर पार्ट मिळणार आहेत.
ट्रॅक्टरची किंमत किती
शेतकरी मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही याला अगदी सहजरित्या खरेदी करू शकता आणि तुमच्या शेतातील कामे व्यवस्थितपणे करू शकता. त्याची किंमत फक्त 61 हजार रुपये आहे. तुम्हाला हा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्ही आम्ही दिलेल्या नंबर वरती संपर्क साधू शकता त्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर मिळेल.