NCCF Onion Price: एनसीसीएफने जाहीर केला ‘या’ आठवड्याचा कांदा बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF Onion Price) माध्यमातून गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी (Onion Market) सुरू आहे. नाफेडसह एनसीसीएफ आपला कांदा भाव ठरवत असते. त्यानुसार एनसीसीएफने या आठवड्यासाठी क्विंटलला 2940 रूपयांचा भाव (NCCF Onion Price) दिला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच जिल्ह्याकरिता एकच भाव दिलेले आहे.

कालच्या बाजार भाव अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Onion Market) उन्हाळ कांद्याला (Summer Onion) क्विंटलमागे सरासरी 2751 रुपये तर पिंपळगाव बाजार समिती 03 हजार रूपयांचा सरासरी दर (Onion Rate) मिळाला आहे. दुसरीकडे एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी (Onion Purchase) सुरू आहे. या ठिकाणी एनसीसीएफने आठवड्यासाठी 2940 रुपये भाव (NCCF Onion Price) ठरविण्यात आला आहे. त्यामुळे कालच्या बाजार अहवालानुसार पिंपळगाव बाजार समितीचा (Pimpalgaon Market) जर विचार केला तर जवळपास 60 रुपयांचा तर लासलगाव बाजार समितीच्या भावात 150 रुपयांचा फरक असल्याचे दिसून येत आहे.

25 जूनला असे होते बाजारभाव

मंगळवार 25 जूनच्या बाजारभावाचा विचार केला तर नाशिक बाजार समिती उन्हाळ कांद्याला 2700 रुपये दर मिळाला होता. तर लासलगाव बाजार समितीत 3100 रुपयांचा दर मिळाला होता. पिंपळगाव बाजार समितीत तब्बल 3250 रुपये बाजार भाव मिळाला होता. मात्र आज बाजारभावात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. लासलगाव बाजार समितीत 150 रुपये तर पिंपळगाव बाजार समितीत 250 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.

कसे होते कालचे बाजारभाव

काल 26 जूनला उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2600 रुपये, लासलगाव बाजार 2751 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 2800 रुपये, सिन्नर नायगाव बाजारात 2850 रुपये, कळवण बाजारात 2500 रुपये, मनमाड बाजारात 2700 रुपये, तर पिंपळगाव बसवंत आणि देवळा बाजारात 03 हजार रुपयांचा दर मिळाला. मंगळवार पेक्षा काल उन्हाळ कांद्याचा बाजार घसरला असल्याचा दिसून आले.

error: Content is protected !!