पीक विमा वितरणासाठी सरकार आणणार कॅपिंग सिस्टीम; शेतकऱ्याला मिळणार जास्त फायदा

Bhuse
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची चालवलेली अमर्याद पिळवणूक लक्षात घेऊन, राज्य सरकारने विमा कंपन्यांना चाप लावण्याचे धोरण आखले आहे. यामुळे, विमा कंपन्यांनी चालवलेल्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला आळा बसून शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे भाष्य केले.

राज्य सरकार सध्या पिक विमा वितरणासाठी नफा आणि तोटा कॅपिंग सिस्टीम आणण्यासाठी धोरण आखत आहे. यासाठी, धोरण निश्चिती करून योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले. या धोरणामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा मिळणार आहे. व पीक विमा कंपन्या करत असलेल्या फसवणुकीला आळा बसू शकणार आहे.

गेल्या वर्षी पीक विमा कंपन्यांनी जमा झालेल्या 5800 कोटींपैकी केवळ 900 कोटी रुपयांच्या रकमेचे शेतकऱ्यांना विमा रक्कमेचे वितरण केले. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांमधून वेळोवेळी विरोध आणि सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार, सरकार आता विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप लावण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांना सांगितले.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा