New Fire-Resilient Plant: पश्चिम घाटात सापडली आगीच्या सानिध्यात फुलणारी ‘ही’ आग प्रतिरोधक वनस्पती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शास्त्रज्ञांनी पश्चिम घाटात आगीला प्रतिरोधक (New Fire-Resilient Plant) आणि वर्षातून दोनदा फुलणारी डिक्लिपटेरा पॉलिमॉर्फा (Dicliptera polymorpha) ही वनस्पतीची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अद्वितीय पद्धतीने फुलणारी रचना असलेली ही पहिलीच भारतीय प्रजाती (New Fire-Resilient Plant) आहे.

भारतातील चार प्रमुख जागतिक जैवविविधता आढळून येणाऱ्या महत्वाच्या ठीकानापैकी एक असलेल्या  पश्चिम घाटामध्ये (Western Ghats) या नवीन वनस्पतिचा शोध लावला गेला आहे. पश्चिम घाट हे समृद्ध आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या आणि नवीन वनस्पतींसाठी ओळखला जातो.

डॉ. मंदार दातार आणि वनस्पतिशास्त्रज्ञ आदित्य धारप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या (एआरआय) शास्त्रज्ञांनी पीएच.डी. विद्यार्थी भूषण शिगवान यांनी ही आग-प्रतिरोधक वनस्पती प्रजाती ओळखली आहे. डिक्लिपटेरा पॉलिमॉर्फा नावाची ही प्रजाती दुर्मिळ, वर्षातून दोनदा -फुलणारी ही वनस्पती आग-प्रवण गवताळ प्रदेशात वाढते (New Fire-Resilient Plant).

डिक्लिपटेरा पॉलीमॉर्फाच्या शोधामुळे डिक्लिपटेरा वंशामध्ये नवीन प्रजाती (New Plant Species) जोडली गेली आहे आणि ही पहिली भारतीय वनस्पती आहे पुष्पबंध किंवा फुलोरा पद्धतीने फुलते, जी सामान्यत: आफ्रिकन प्रजातींमध्ये आढळते. या वनस्पतीच्या वेगळ्या ब्लूमिंग पॅटर्नमुळे ते  वर्षातून दोनदा फुलू शकते. एकदा नोव्हेंबर ते एप्रिल या काळात आणि दुसऱ्यांदा मे आणि जूनमध्ये म्हणजेच आग प्रवण गवताळ प्रदेशात.

पायरोफिटिक, किंवा अग्नि-प्रतिरोधक (New Fire-Resilient Plant), वैशिष्ट्यामुळे डिक्लिपटेरा पॉलिमॉर्फा उत्तर पश्चिम घाटाच्या अत्यंत कठीण परिस्थितीसाठी उल्लेखनीयपणे अनुकूल बनते.

गवताळ प्रदेशासाठी ओळखल्या जाणाऱ्या तळेगाव-दाभाडे या प्रदेशात प्रथम गोळा केलेल्या या प्रजातीचा अनेक वर्षांपासून काळजीपूर्वक अभ्यास केला जात आहे. केव बुलेटिनमध्ये प्रकाशित केलेल्या निष्कर्षांसह लंडनच्या केव बोटॅनिक गार्डन्सच्या डॉ. आय. डार्बीशायर यांनी त्याच्या विशिष्टतेची पुष्टी केली. अग्नीला प्रतिरोधक आणि दिसायला आकर्षक यामुळे या विशेष वनस्पतीचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मानव-प्रेरित अग्नी वनस्पतीला दुसऱ्यांदा फुलायला मदत करते. परंतु अति प्रमाणात जाळ  या वनस्पतीच्या मुलस्थानासाठी धोकादायक ठरू शकते. डिक्लिपटेरा पॉलिमॉर्फाच्या जीवनचक्रासाठी आग आवश्यक असल्याने, गवताळ प्रदेशातील आगीचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. ही प्रजाती आणि तिची परिसंस्था जतन करण्यासाठी स्थानिक जमिनीच्या वापरासोबतच संवर्धन करणे आवश्यक आहे.

डिक्लिपटेरा पॉलिमॉर्फाचा (New Fire-Resilient Plant) शोध पश्चिम घाटातील अनपेक्षित जैवविविधतेवर प्रकाश टाकते, आणि या नाजूक परिसंस्थेचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

या नवीन शोधामुळे पश्चिम घाटांचे संरक्षण आणि त्यावर अभ्यास करण्याची गरज आहे हे सिध्द झाले आहे.

error: Content is protected !!