New Holland 3037 TX : ‘न्यू हॉलंड 3037 TX’ ट्रॅक्टर; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ट्रॅक्टर निर्माता कंपनी न्यू हॉलंडने (New Holland 3037 TX) भारतीय शेतकऱ्यांसाठी क्षमतेनुसार विविध रेंजच्या ट्रॅक्टर निर्मिती केली आहे. कंपनीकडून ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर कृषी उपकरणांची निर्मिती देखील केली जाते. न्यू हॉलंड कंपनीने अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांची गरज ओळखून ‘न्यू हॉलंड 3037 TX’ हा तगडा आणि बलवान ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी डिझाईन केला आहे. तुम्हीही आपल्या अधिक जमिनीसाठी बलवान आणि ताकतवान ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी न्यू हॉलंड कंपनीचा ‘न्यू हॉलंड 3037 TX’ (New Holland 3037 TX) हा ट्रॅक्टर चांगला पर्याय ठरू शकतो.

‘न्यू हॉलंड 3037 TX’ बद्दल (New Holland 3037 TX Price And Features)

न्यू हॉलंड कंपनीने 2500 cc क्षमतेचे 3 सिलेंडर वॉटर कूल्ड इंजिन ‘न्यू हॉलंड 3037 TX’ (New Holland 3037 TX) या ट्रॅक्टरला दिलेले आहे. जे 39 एचपी पॉवरसह 2000 आरपीएमची निर्मिती करते. कंपनीने या ट्रॅक्टरला प्री-क्लीनर, एअर फिल्टरसह ऑइल बाथ प्रकार दिला आहे. ‘न्यू हॉलंड 3037 TX’ ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पॉवर 35 HP आहे. या न्यू हॉलंड ट्रॅक्टरला कंपनीने फॉरवर्ड स्पीड 28.16 किमी प्रतितास आणि रिव्हर्स स्पीड 9.22 किमी प्रतितास इतका दिला आहे. हा ट्रॅक्टर अत्यंत बलवान असून, तो 1800 किलो लोडिंग क्षमतेसाठी डिझाईन करण्यात आला आहे. ‘न्यू हॉलंड 3037 TX’ ट्रॅक्टरचे एकूण वजन 1815 किलो असून, कंपनीने हा ट्रॅक्टर 2045 मीमी व्हील बेसमध्ये, तर 395 मीमी ग्राउंड क्लीअरन्सनुसार तयार केला आहे.

‘न्यू हॉलंड 3037 TX’ची वैशिष्ट्ये

  • न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टीयरिंग देण्यात आली आहे.
  • या ट्रॅक्टरमध्ये 8 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स/ 8 फॉरवर्ड + 8 रिव्हर्स गीअर्स असलेला गिअरबॉक्स देण्यात आला आहे.’
  • कंपनीने या ट्रॅक्टरला सिंगल/डबल क्लच दिला आहे आणि तो कॉन्स्टंट मेश एएफडी साइड शिफ्ट प्रकार ट्रान्समिशनसह येतो.
  • याशिवाय कंपनीने ट्रॅक्टरला 46 लिटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे.
  • ‘न्यू हॉलंड 3037 TX’ हा ट्रॅक्टर रिव्हर्स PTO आणि GSPTO प्रकारातील पॉवर टेक ऑफ सह येतो. जो 540S, 540E RPM जनरेट करतो.
  • न्यू हॉलंड 3037 TX हा 2 WD ड्राइव्ह ट्रॅक्टर आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने 6.50 x 16 रचनेत पुढील टायर तर 13.6 x 28 रचनेत मागील टायर दिले आहेत.

किंमत किती?

न्यू हॉलंड 3037 TX या ट्रॅक्टरची किंमत कंपनीने भारतीय शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट लक्षात घेऊन निश्चित केली आहे. कंपनीने देश पातळीवर सर्व ठिकाणी एक्स-शोरूम किंमत ही 6.34 लाख ते 7.08 लाख रुपये इतकी ठेवली आहे. ज्यात देशातील वेगवेगळ्या ठिकाणी ऑन रॉड प्राईसमध्ये बदल होऊ शकतो. न्यू हॉलंड 3037 TX ट्रॅक्टर हा अधिक बलवान असून, कंपनीने अत्यंत माफक किमतीमध्ये तो शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

error: Content is protected !!