परभणीत पावसाची दडी, सोयाबीन वाळून चालल्याने शेतकरी चिंतेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याविना सोयाबीन वाळू लागले आहे. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पीक असल्यामुळे आणि नेमके याच वेळी पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे.

सुरुवातीच्या काळात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळं सोयाबीन पिक पिवळे पडले होतो. मात्र, शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करुन पिक कसेबसे वाचवले होते. मात्र, मागच्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसानं उघडीप दिल्यानं शेंगा भरण्याच्या मोसमातच सोयाबीन वळून जात आहे. तर इतर पिकंही कोमेजली आहेत.

शासनाकडून मदतीची मागणी

गेल्या महिनाभरापासून पाऊस नाही, सुरुवातीला मोठा पाऊस झाला. त्यामुळ सोयाबीन पिवळं पडलं होते. मात्र अनेक फवारण्या केल्यावर कसेबसे सोयाबीन वाचले होते. मात्र, आता पाण्याची गरज असताना पाऊस पडत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आम्ही एकरी सोयाबीनला 20 हजार रुपयांचा खर्च केला आहे. शासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पीक विमा द्यावा. हेक्टरी 50 हजार रुपयांची दत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!