आता फक्त 51 हजार रुपयांत घरी आणा JCB , 30 एप्रिलपर्यंत ऑफर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरेतर JCB सारखी मोठी यंत्रे घ्यायचे म्हंटले तर त्याच्या अव्वाच्या सव्वा किंमती पाहूनच धक्का बसतो. मात्र त्यामधून मिळणारे उत्पन्नही चांगले असते. खुदाई च्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या या यंत्राचे भाडे देखील चांगले मिळते. बांधकाम क्षेत्रामध्ये या यंत्रांचा चांगला वापर होतो. आता JCB खरेदी करणे सोपे होणार आहे कारण कंपनी कडून चांगली ऑफर दिली जात आहे. जेसीबी (JCB) या सर्वात मोठ्या बुलडोझर उत्पादक कंपनीने एक उत्तम ऑफर सुरू केली आहे. जेसीबीच्या या ऑफरमध्ये तुम्ही फक्त 51 हजार रुपयांच्या ईएमआयवर JCB खरेदी करून घरी आणू शकता.

काय आहे ऑफर ?
–एप्रिल कार्निव्हल ऑफरमध्ये सर्वात कमी किमतीत बुलडोझर खरेदी करता येईल, असे जेसीबीच्या अधिकृत फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
— पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘हे क्रॅच तुमच्या आवडत्या बॅकहो लोडरला सर्वात कमी EMI वर खरेदी करा.
–ऑफर फक्त 30 एप्रिलपर्यंत वैध आहे.
–अधिक जाणून घेण्यासाठी https://bit.ly/April-offers या पेजला भेट द्या’.
–यासोबतच या ऑफर अंतर्गत 4 ते 5 वर्षांसाठी कर्जाची सुविधा असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय आहे कर्जाची सुविधा ?
–कंपनीने सांगितले आहे की, ही ऑफर फक्त या महिन्यापर्यंत वैध आहे. ही ऑफर 30 एप्रिल नंतर संपेल. सध्या,
— या ऑफर अंतर्गत, सुंदरम फायनान्स , इंडसइंड बँक, चोला आणि हिंदुजा लेलँड फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जाची सुविधा दिली जात आहे.
–एप्रिल कार्निवल ऑफरमध्ये, जेसीबीच्या बॅकहो लोडरसाठी 28 लाखांपर्यंत फायनान्स उपलब्ध आहे.
–कंपनी 7.49 टक्क्यांपर्यंत परवडणारे व्याज दर देत असल्याने, याचा ईएमआय दरमहा 51 रुपये हजार इतका आहे.
–ही ऑफर JCB 3DX ECO साठी आहे, ज्याचे इंजिन 76hp पॉवर आहे.

बॅकहो लोडरची किंमत किती?

–बॅकहो लोडर JCB 3DX ECO ची किंमत 30 लाखांपेक्षा थोडी जास्त आहे.
–ऑफरमध्ये हे खरेदी करण्यासाठी ग्राहकाला जवळपास 2 लाख रुपयांचे डाउनपेमेंट करावे लागेल.
–जेसीबी कंपनीचा सर्वात लहान बुलडोझर JCB 1CX या नावानेही ओळखला जातो.
–त्याचे वजन सुमारे 1,530 किलो आहे. आता मागणीत झपाट्याने वाढ होत असल्याने कंपन्या हायटेक फीचर्सने सुसज्ज बुलडोझर बनवत आहेत.
–सध्या JCB 3DX ECO Excellence आणि JCB 3DX ECO Xpert सारख्या बुलडोझरची सर्वाधिक विक्री होत आहे.

या मॉडेलवरही मिळतेय ऑफर…

—एप्रिल कार्निव्हल ऑफरमध्ये जेसीबी व्हीलेड लोडर (JCB Wheeled Loader), एक्स्कॅव्हेटर (JCB Excavator), जेसीबी 225 एलसी इको+ वरही (JCB 225 LC Eco+) सवलत आहे.
–कंपनी व्हील लोडरसाठी 90 टक्क्यांपर्यंत फायनान्स करत आहे आणि 60 दिवसांच्या मोरेटोरियमची सुविधा देखील उपलब्ध आहे.
–एक्स्कॅव्हेटर आणि 225 LC Eco+ साठी देखील अशीच ऑफर उपलब्ध आहे.
–या दोन्हींवर 90 टक्क्यांपर्यंत फायनान्स उपलब्ध आहे.
–ऑफर सर्व मॉडेल्सवर 30 एप्रिलपर्यंत वैध आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!