चांगली बातमी! आता कीटकनाशकांची होम डिलिव्हरी होणार, सरकारने बदलला हा नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कीटकनाशक नियमात बदल केला आहे. आता शेतकऱ्यांना कीटकनाशके घेण्यासाठी बाजारात जावे लागणार नाही, त्याऐवजी त्यांना होम डिलिव्हरी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून कीटकनाशकांच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिली आहे. आता कंपन्या कायदेशीररित्या कीटकनाशके विकू शकणार आहेत. विशेष म्हणजे आता फक्त अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला कायदेशीररित्या कीटकनाशकांची विक्री करण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

अहवालानुसार कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांना यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. यासोबतच कंपन्यांना परवाना नियमांचे पालन करणेही बंधनकारक असेल. परवान्याची पडताळणी करण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपनीची असेल. त्याचबरोबर केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आता त्यांना कीटकनाशके खरेदी करण्यासाठी घरोघरी भटकावे लागणार नाही. तसेच या नियमामुळे आगामी काळात कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी स्वस्त होणार आहेत. याशिवाय कीटकनाशकांच्या बाजारात स्पर्धा वाढणार आहे.

किडींच्या हल्ल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. असे बरेच कीटक देखील आहेत, जे कळपाने हल्ला करतात आणि काही तासांत संपूर्ण पिकाची पाने खातात. त्यामुळे पीक नष्ट होते. एका आकडेवारीनुसार, दरवर्षी भारतात हजारो हेक्टर जमिनीवर उगवलेली पिके कीटकांमुळे नष्ट होतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार भरपाईही जाहीर करते.

स्रोत – टीव्ही ९

error: Content is protected !!