केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही केले उसाबाबत मोठे विधान; शेतकऱ्यांना दिला सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊसाला ‘आळशी शेतकऱ्यांचे पीक’ असं विधान केलं होतं. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर आता वाढत्या उस क्षेत्राबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील एक वक्तव्य केले आहे. उसाचे क्षेत्र असेच वाढत गेले तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, ऊस हे शाश्‍वत पीक असले तरी शेतकऱ्यांनी इतर पिकांचा हे आधार घेणे गरजेचे आहे तसेच उसाच्या सिरप पासून इथेनॉल निर्मिती केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे आता पर्यायच उरणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी पुढे बोलताना गडकरी म्हणाले यंदा साखरेचे उत्पादन सर्वाधिक भारत देशामध्ये झाले आहे. दुसरीकडे ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन घटले आहे त्यामुळे भारतातील साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अधिक मागणी आहे त्यामुळे विक्रमी गाळामुळे सध्या आमदार बबनराव शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी ते तात्पुरते आहे. उसाचे वाढीचे क्षेत्र हे धोक्यातच राहणार आहे. असे उत्पादन वाढत गेले तर ऊस उत्पादकांना देखील आत्महत्या करण्याची वेळ येईल असं नितिन गडकरी यांनी सुनावले आहे आता पीक पद्धतीमध्ये बदल करून उत्पादन वाढवता येणे शक्य असल्याचही त्यांनी सांगितलं.

पुढच्या वर्षी यापेक्षा बिकट अवस्था असेल

संपूर्ण देशाचा विचार करता देशात सर्वाधिक उसाचं गाळप करणारा कारखाना म्हणून माढा तालुक्यातल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना ओळखला जातो. यंदाही या कारखान्याचे 22 लाख टनाचे गाळप झाल्याचं बबनराव शिंदे यांनी सांगितलं पण 22 लाख टन उसाचे गाळप झालं असलं तरी केवळ ब्राझील मध्ये कारखाने सुरू नसल्यामुळे आपल्याकडच्या साखरेला दर आहे. अन्यथा 22 रुपये दर मिळाला नसता असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले उसाचे गाळप करून साखरेचे उत्पादन यावरच साखर कारखान्यांचा भर आहे. मात्र उसावर प्रक्रिया करून इथेनॉलची निर्मिती केली तर त्याचा अधिक फायदा होणार आहे त्यामुळे मागणीनुसार उत्पादन बदल करण्याची ही चांगली संधी असून प्रत्येक कारखाना इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा सल्ला देखील नितीन गडकरी यांनी दिला. मात्र अतिरिक्त उसाची केवळ चिंता आहे पुढच्या वर्षी यापेक्षा बिकट अवस्था असेल असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!