Omraj Nimbalkar : शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करून त्यांना ६ हजार रुपये देऊन हे सरकार पाट थोपटून घेते; ओमराजे निंबाळकर यांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Omraj Nimbalkar : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यावर मात करत शेतकरी शेतामध्ये पीक फुलवत असतात. मात्र बऱ्याचदा शेतकऱ्यांना चांगल पीक येऊन देखील पैसे मिळत नाहीत याच कारण असं की पिकांचे कोसळलेले बाजार भाव. यामुळे शेतकरी कायमच चिंतेत असतात. मागच्या काही दिवसापासून सोयाबीन आणि कापसाचे भाव खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाचे चढलेले बाजार भाव कमी केले असल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, सोयाबीनचा बाजार भाव दहा हजार रुपयापर्यंत होता मात्र तो साडेचार हजार रुपये पर्यंत आला आहे. याचं कारण असं की सरकारने मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात केली. सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपये मदत देण्याचा फक्त देखावा करत असल्याच देखील ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.

सहा हजार रुपये देऊन पाठ थोपटून घेणारे सरकार

सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव पाडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले असल्याचा गंभीर आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. दिखाव्यासाठी हे सरकार 6000 रुपये शेतकऱ्यांना देत असल्याचं देखील ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव कमी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे 6 हजार रुपये देऊन काहीच होत नसल्याचं देखील ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले आहेत.

शेतमालाचे बाजारभाव कुठे पाहणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेतमालाचे रोजचे बाजार भाव पाहिचे असतील तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही शेतमालाचे दररोज बाजार भाव पाहू शकतात त्याचबरोबर सरकारी योजनांची माहिती, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकता

error: Content is protected !!