OMSS Scheme : केंद्र सरकारचे 10 दशलक्ष टन गहू विक्रीचे उद्दिष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) केंद्र सरकारच्या खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत (OMSS Scheme) आतापर्यंत 3.9 दशलक्ष टन गव्हाची विक्री करण्यात आली आहे. तर देशांतर्गत बाजारात गव्हाची उपलब्धता राहून दर स्थिर ठेवण्यासाठी आगामी 31 मार्च 2024 पर्यंत केंद्र सरकारकडून 10 दशलक्ष टन गव्हाची विक्री (OMSS Scheme) केली जाणार आहे.

केंद्र सरकारकडून बफर स्टॉकमधील गहू आणि तांदळाची साप्ताहिक विक्री केली जाते. या आठवड्यातील विक्री दरम्यान देशांतर्गत पुरवठा वाढवण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. त्यानुसार आता देशांतर्गत बाजारात 31 मार्च 2024 पर्यंत केंद्र सरकारकडून 10 दशलक्ष टन गहू विकला जाणार आहे. या आठवड्यातील लिलावात केंद्राकडून 0.28 दशलक्ष टन गहू विक्री करण्यात आला. तर ‘भारत आटा ब्रँड’ अंतर्गत 0.3 दशलक्ष टन गहू विक्री करण्यात आला आहे. अशी एकूण 0.58 दशलक्ष टन गव्हाची विक्री या आठवड्यात एफसीआयकडून करण्यात आली आहे.

सद्यस्थितीतील साठा (Open Market Sale Scheme In India)

सध्यस्थितीत भारतीय अन्नधान्य महामंडळाकडे 20.91 दशलक्ष टन इतका गव्हाचा साठा शिल्लक आहे. जो 1 जानेवारी 2023 रोजी 13.8 दशलक्ष टन इतका शिल्लक साठा म्हणून नोंदवला गेला होता. अर्थात यावर्षीच्या हंगामात सध्यस्थितीत मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 70 टक्क्यांहून अधिक गहू साठा शिल्लक आहे. त्यामुळे आता सरकारने खुल्या बाजारातील गहू विक्रीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

2125 रुपये हमीभाव

या आठवड्यातील लिलावात गव्हाला 2249.73 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. केंद्र सरकारने गहू पिकासाठी 2125 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. पुढील हंगामात 1 एप्रिल 2024 पासून शेतकऱ्यांच्या गव्हाची सरकारी खरेदी सुरु होईल. त्या अगोदर 1 एप्रिल 2024 रोजी 7.46 दशलक्ष टन गहू साठा शिल्लक ठेऊन उर्वरित सर्व गहू साठ्याची विक्री करण्याची सरकारची योजना आहे.

error: Content is protected !!