‘एक दिवस बळीराजासाठी’ अधिकाऱ्यांसह कृषीमंत्री शेतात मुक्कामी; सरकारची नवी संकल्पना जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : शिंदे फडणवीस सरकार ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पावसाळी आधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक महत्वपूर्ण घोषणा केली. आता राज्यात ‘एक दिवस बळीराजासाठी’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत कृषी विभागाचे सचिव, अधिकारी सगळेच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

याबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांना समृद्ध करणे हा या योजनेमागचा हेतू असून, राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करणे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. त्यात शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहोचतील. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील, असंही सत्तार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी जाणून घेणार

90 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार आहे. दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, बॅंकेच कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा या मोहिमेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. मोहीम संपल्यानंतर सर्व जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार, असेही सत्तार यांनी अधिवेशनात स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!