Onion Export Duty: कांदा निर्यातशुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत! कांदा निर्यातबंदी उठवण्याचा फायदा नाहीच

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारतर्फे कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी निर्यातशुल्क (Onion Export Duty) वाढविल्याने शेतकर्‍यांना कांदा निर्यातीस (Onion Export) अडचणी आल्या आहेत. परिणामी बाजारपेठेत कांद्याचे दर पडले आहेत. लासूर स्टेशन येथील कांदा बाजारात गेल्या पाच दिवसांत कांदा क्लिंटनमागे पाचशे रूपयांनी घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत (Onion Export Duty) .

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन (ता. गंगापूर) ही कांद्याची मोठी बाजारपेठ (Onion Market) आहे. जिल्ह्यासह येथे शेजारील जिल्ह्यांमधूनही कांदा विक्रीला येतो. तसेच जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांची संख्याही मोठी आहे. यंदा शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने कांदा लागवड केली होती. मात्र ऐन कांदा उत्पादन विक्रीला नेण्याच्या कालावधीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) लागू केली.

यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर (Onion Rate) प्रचंड घसरले. यामुळे कांदा लागवडीतून आर्थिक फायद्याची आशा असलेल्या शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीला सामोरा जावे लागत आहे. अगोदरच शेतकरी निसर्गाच्या प्रकोपाचे शिकार ठरत आहेत. त्यात सुलतानी कायद्यांनी पुन्हा कंबरडे मोडले जात असल्याने बळीराजाने कोणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (Krushi Utpann Bajar Samiti) अंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये मोकळ्या कांद्याचा लिलाव सुरू आहे. केंद्र सरकारने नुकतीच कांद्यावरील निर्यातबंदी उठवत असल्याचे जाहीर केले. यामुळे शेतकर्‍यांप्रमाणेच व्यापार्‍यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सरकारने कांद्यावर निर्यातशुल्क (Onion Export Duty) वाढविल्यामुळे पुन्हा कांदा निर्यातीस अडचणी आल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांचा हिरमोड झाला आहे.

कांदा निर्यातबंदी हटविल्यानंतर खरीपाच्या पेरणीसाठी (Kharif Onion Cultivation) शेतकरी खत, बियाणे, आदी खरेदी करण्यासाठी साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी आणत आहेत (Onion Export Duty) .

4 मे रोजी कांद्याला 2100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर निर्यातशुल्क जाहीर झाल्यानंतर पुन्हा कांद्याच्या भावाला उतरती कळा लागली. बुधवारी 8 मे 2024 रोजी कांद्याचे भाव 500 रूपयांनी घटून 1600 रूपयांपर्यंत खाली आले. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

उन्हाळी कांद्याला 4 मे ला कमीत कमी – 400 रुपये क्विंटल, जास्तीत जास्त – 2105 रुपये क्विंटल, सरासरी –  1800 रुपये प्रति क्विंटल असे भाव मिळाले. एकूण लिलाव झालेली वाहने 576 एवढी होती.

8 मे रोजी उन्हाळी कांद्याचा भाव कमीत कमी – 250 रुपये क्विंटल, जास्तीत जास्त – 1602, आणिसरासरी – 1300 रुपये क्विंटल एवढा भाव होता. यावेळीएकूण लिलाव झालेली वाहने 358 एवढी होती.