Onion Export Quota: निर्यात कोट्याची ‘न्याय आणि समान वाटपाची कांदा निर्यातदारांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राजकीय नेते आणि वरिष्ठ सरकारी (Onion Export Quota) अधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे निर्माण झालेल्या गोंधळात निर्यातदारांनी कांदा निर्यात कोट्याचे न्याय्य वितरण करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. सध्या 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी कायम असली तरी भूतान, बहरीन, बांगलादेश आणि मॉरिशस या देशासाठी मर्यादित कोटा मंजूर करण्यात आला आहे.

केंद्राने अलीकडेच निवडक देशांना मर्यादित प्रमाणात कांदा निर्यात करण्याची घोषणा केल्याने निर्यातदारांनी सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत. कांदा निर्यातदार संघटना हॉर्टिकल्चर प्रोड्युस एक्सपोर्टर्स असोसिएशन (HPEA) ने सर्व निर्यातदारांमध्ये निर्यात कोट्याचे (Onion Export Quota) ‘न्यायपूर्ण आणि समान वितरणासाठी केंद्राकडे संपर्क साधला आहे.

वाढत्या किमतींवर लगाम घालण्यासाठी आणि महागाईला आळा घालण्यासाठी भारताने 7 डिसेंबरपासून 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपच्या काही राजकीय नेत्यांनी नुकतीच सरकार ही बंदी मागे घेणार असल्याची विधाने केली होती. यानंतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांवर निर्यातबंदी कायम राहील, असे वक्तव्य केले होते. नंतर, सरकारने जाहीर केले की ते भूतान, बहरीन, बांगलादेश आणि मॉरिशसमध्ये 54,760 टन कांद्याची निर्यात (Onion Export Quota) करण्यास परवानगी देईल.

महाराष्ट्रातील कांदा निर्यातदाराने आरोप केला की निवडक देशांच्या निर्यात कोट्यातील केवळ तीन ते चार निर्यातदारांनाच वाटा देण्यात आला आहे. काही भारतीय व्यापाऱ्यांना कांद्याच्या निर्यातीसाठी पत्रे मिळाली आहेत. निर्यातदारांचा हाच गट बांगलादेशला निर्यात करण्यासाठी नाशिक ते कोलकाता या रेल्वे वाहतुकीसाठी बाजारात चौकशी करत आहे आणि खरेदी सुरू केली आहे.

हॉर्टिकल्चर प्रोड्युस एक्सपोर्टर्स असोसिएशनने (HEPA) ग्राहक व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहून विनंती केली आहे की स्वारस्य असलेल्यांना सहभागी होण्यासाठी निर्यात पद्धती सर्व सदस्यांना कळवाव्यात. हॉर्टिकल्चर प्रोड्युस एक्सपोर्टर्स असोसिएशनने (HEPA) मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, आमच्या सहयोगी सदस्यांना न्याय्य आणि समान प्रमाण वितरणासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो. सध्या जगभरात कांद्याची टंचाई आहे, ज्यामुळे भारतीय कांद्याची मागणी वाढली आहे, विशेषत: मार्चमध्ये रमजान सण साजरा करणाऱ्या देशांकडून मागणी वाढली आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर 300% पर्यंतचा प्रचंड नफा मिळत असल्याने कांद्याची तस्करी सुद्धा होत आहे. त्यातच केंद्र सरकार पाळू इच्छित असलेल्या निर्यातीच्या पद्धती याबद्दल निर्यातदार यांच्यात काही प्रमाणात संभ्रमाची स्थिती  आहे (Onion Export Quota).

error: Content is protected !!