कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 350 रुपयांच्या Subsidy साठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन | कांद्याच्या उतरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने 350 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कधीपर्यंत अर्ज करावा लागेल याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 350 रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीत खाजगी बाजारात थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे किंवा नाफेडकडे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या काळात कांद्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान 200 रुपयांच्या मर्यादेपर्यंत मिळणार आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या आणि घरबसल्या, एका क्लीक वर योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही अगदी फ्री मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.
Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी विहित मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना कांद्याचे 350 रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

कोणती कागदपत्रे लागतील

१) विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी
२) कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा
३) बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स
४) आधार कार्डची झेरॉक्स

error: Content is protected !!