भुसावळच्या कांद्याची कमाल; 12 माहिने राहतो टूमटुमित, लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची धमाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Onion Farming) : शेतीत नवनवीन बाबी घडत असतात. मग त्या पिकांबाबत असो की, तंत्रज्ञानाबाबत मात्र यंदाच्या वर्षात कांद्याने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल केलं होतं. तसेच यंदा कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पहायला मिळाले होते. मात्र भुसावळच्या कांद्याबाबत ऐकाल तर नवलच वाटेल. भुसावळ भागातील कांदा अधिक काळ टिकून राहत असून परराज्यातून या कांद्याला मागणी पहायला मिळते.

भुसावळ भागातील कांद्याला अधिकाधिक मागणी असते. भुसावळ महसूल मंडळामध्ये ३०२ हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करता आली. भुसावळ भागात लागवड केलेला कांदा काढण्यास सुरुवात झाली. हा कांदा बारा महिने खराब होत नाही. या कांद्याला पश्चिम बंगालमध्ये अधिक मागणी आहे, यामुळे भुसावळ येथील शेतकरी मालामाल होताना दिसतात.

भुसावळ तालुक्यातील या भागात महसूल मंडळ लागवड

भुसावळ तालुक्यातील भुसावळ, कुन्हा पानाचे, वरणगाव, पिंपळगाव खुर्द ही चार महसूल मंडळ आहेत. यात भुसावळ भागाचे २ हेक्टर, कुन्हा पानाचे ४० हेक्टर, वरणगाव १६३ हेक्टर तर पिंपळगावात ३०२ हेक्टर कांद्याची लागवड करण्यात आली. सर्वाधिक कमी लागवड ही भुसावळ मंडळात झाली.

साकरी, वेल्हाळा, वरणगाव या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात येते. लाल कांदा हा शेताच्या बांधावरून व्यापारी थेट पश्चिम बंगालच्या बाजारात घेऊन जात असतात. सध्या बाजारात या कांद्याची ४० किलोची गोनी २२० ते ३०० रुपयांपर्यंत विकली जाते. हा कांदा टिकाऊ असल्याने तसेच दरही परवडणारे असून या कांद्याला अधिक मागणी आहे.

error: Content is protected !!