राज्यातील कृषी बाजारसमितीत कांद्याची आवक बंद; शेतकऱ्यांनी जायचं कुठं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले अवकाळी पाऊस थांबत नाही. काही दिवसांपूर्वी काही भागात अवकाळी पाऊस थांबला आहे. मात्र पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम हा शेतपिकांवर होताना दिसतो. असे असताना शेतकरी कांदा घेऊन कृषी उत्पन्न बाजारसमितीकडे कांद्याची आवक करताना दिसत आहे. मात्र त्यांना त्या ठिकाणाहून पुन्हा घराकडचा रस्ता धरावा लागत आहे.

अवकाळी पावसाने कांद्याला योग्य भाव नसल्याने कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याची विक्री करणं बंद झाली आहे. दुसरीकडे कांदा खरेदीत वाढ होत नसल्याने अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जायचे कुठे ? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. यामुळे आता शेतकरी कांदा हा खासगी बाजारसमितीत घेऊन येऊ लागला आहे. यामुळे याचा फायदा आता शेतकऱ्यांना किती होईल हे सांगता येत नाही.

पंचनामा यादीत नाव तरीही अनुदान नाही :

तर दुसरीकडे करमाळा तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कांदा, उडीद, मका, फळबागांचे नुकसान झालं आहे. काही शेतकऱ्यांना पंचनामा यादीत नाव असलं तरीही अनुदान देण्यात आलं नाही. शासकीय कार्यालयात याबाबत विचारणा केल्यास सर्वी कामं चाल ढकलीवर पहायला मिळत आहेत. अशी माहिती शेतकऱ्यांना दिली आहे.

error: Content is protected !!