शेतकऱ्यांना दिलासा! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Onion Market) : महाराष्ट्रात कांद्याच्या दरात अनेक दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून तोट्यात जावं लागत आहे. काही वेळा तर बजारपेठेत एक रुपया किलोने कांदा विकला गेला होता. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये कांदे रस्त्यावर फेकून दिले होते. परंतु आता नाफेडच्या कांद्याच्या भावाबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कांद्याला रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत. कांद्याचे रास्त भाव वाढवण्यासाठी यावर आता केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी महत्वाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी शासनाच्या कांदा खरेदी दरात वाढ करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. यानुसार आता नाफेडच्या कांदा खरेदीत वाढ होणार आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर कसे मिळवायचे?

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतमालाचे रोजचे भाव आता तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर मिळवणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं ठरत असून यावर शेतीशी संबंधित सर्व समस्यांचे उपाय आहेत. सातबारा उतारा काढणे, जमीन मोजणे, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच Hello Krushi डाउनलोड करून घ्या.

मागील वर्षी कांद्याची खरेदी हे २.५ टन लाख ते ३ लाख टनापर्यंत करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) यांना खरीप पिकांच्या यादीत कांदा घेण्यास सांगितले होते. आतापर्यंत शेतकऱ्यांचे कांद्यामुळे अधिक प्रमाणात तोटा पहायला मिळाला. यामुळे राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. (Onion Market)

शेतकऱ्यांना दिलासा तरीही नुकसान सुरूच

या महिन्याच्या सुरुवातीला शासनाने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी कांद्याची भरपाई देण्याचा निर्णय घेतला. परंतु असे असले तरीही कांद्याचे नुकसान हे होणारच आहे. मागील वर्षी म्हणजे २०२१ – २२ या वर्षात ३०.७० दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परंतु २६ दशलक्ष टन एवढे उत्पादन झाले.

error: Content is protected !!