Onion Market Price : कांद्याच्या बाजारभावात सुधारणा ! पहा आज किती मिळाला दर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून कांद्याचे (Onion Market Price) दर हे सतत खाली उतरलेले होते कांद्याला कमाल दर पंधराशे रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र आता कांद्याचे सध्याचे बाजार भाव पाहता कांद्याला हळूहळू चांगला भाव मिळताना दिसत आहे. कांद्याच्या कमाल भावामध्ये सुधारणा झाल्याचं बाजारभावावरून लक्षात येत आहे.

आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक 3200 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे.

हा दर शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Onion Market Price) इथे मिळाला असून आज शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथे नंबर एक कांद्याची बाराशे क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव दोन हजार रुपये, कमाल भाव तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण भाग दोन हजार रुपये इतका मिळाला आहे.

तर त्या खालोखाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) सर्वाधिक तीन हजार रुपयांचा भाव मिळालेला आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये 12,102 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव शंभर रुपये कमाल भाव तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये इतका मिळालाय.

तर सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली असून हे आवक 13,151 क्विंटल इतके झाली आहे.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08/10/2022
कोल्हापूर क्विंटल 4239 700 2500 1400
सोलापूर लाल क्विंटल 12102 100 3000 1100
पंढरपूर लाल क्विंटल 508 200 2200 1100
साक्री लाल क्विंटल 11155 500 2655 1700
पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 1000 1400 1200
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 11 1300 1400 1350
पुणे-मोशी लोकल क्विंटल 295 500 1400 950
जामखेड लोकल क्विंटल 146 100 2500 1300
शेवगाव नं. १ नग 1200 2000 3200 2000
शेवगाव नं. २ नग 3974 1000 1900 1900
शेवगाव नं. ३ नग 2700 200 900 900
येवला उन्हाळी क्विंटल 7000 250 2050 1500
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 3000 200 2025 1500
लासलगाव उन्हाळी क्विंटल 6705 900 2023 1800
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 11670 600 2100 1800
मनमाड उन्हाळी क्विंटल 2000 1000 1866 1600
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 2960 450 2313 1680
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 13151 300 2455 1855
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 5220 600 1950 1625
वैजापूर उन्हाळी क्विंटल 3705 550 2700 1700
error: Content is protected !!