Onion Market Rate Today: राज्यात ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 7400 चा भाव! जाणून घ्या इतर बाजार समितीतील कांद्याचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: निवडणुकीनंतर कांद्याचे दर (Onion Market Rate Today) खाली येतील असा अंदाज बांधला जात असताना, आजही राज्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळालेला आहे. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर तेजीत असून यामुळे शेतकऱ्यांना (Onion Farmers) दिलासा मिळतोय.

कांद्याच्या घाऊक भावाने (Onion Market Rate Today) महाराष्ट्रात विक्रम केला आहे. सध्या कांद्याची आवक कमी असल्याने बहुतांश बाजारपेठेत कांद्याचे भाव तेजीत आहेत. राज्यातील काही बाजारात (Onion Market) त्याचे दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त आहेत.  

राज्यात विविध बाजार समितीत आजचे कांद्याचे बाजारभाव (Onion Market Rate Today)

आज 22 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात कांद्याला (Maharashtra Onion Market Rate) सरासरी 4152.29 रूपये/क्विंटल भाव मिळालेला आहे. सर्वात कमी बाजारभाव 450 रुपये/क्विंटल आणि जास्तीत जास्त बाजारभाव 7400 रूपये/क्विंटल मिळालेला आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 7400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. कमीत कमी 3000 रूपये आणि जास्तीत जास्त 5200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान 2500, कमाल 6500 आणि सरासरी 4500 रूपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान 1000, कमाल 6500 आणि सरासरी 2600 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यतील कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळी कांद्याला किमान 2400, कमाल 6500 आणि सरासरी 5411 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान 3700, कमाल 6,415 आणि सरासरी 5800 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

चंद्रपूर (गंजवाड) बाजार समितीत किमान 2000, कमाल 5000 आणि सरासरी 4000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे (Onion Market Rate Today).

error: Content is protected !!