कांदा उत्पादकांची डोकेदुखी कायम ! दरवाढीनंतर पुन्हा एकदा कांदा दरात घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादकांना यंदाच्या वर्षी दराच्या बाबतीत मोठे नुकसान सहन करावे लागले. सुरवातीला उन्हाळी कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाला. ऑक्टोबर महिन्यात मागणी वाढली. नोव्हेम्बर महिन्याच्या सुरवातीला दरात वाढ होऊन २,५०० रुपये दर मिळू लागला. मात्र आता पुन्हा एकदा दरात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडलाय.

गत रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा उत्पादन वातावरणीय बदलांमुळे अडचणीत सापडल्याची परिस्थिती होती. त्यामुळे एकरी उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत फटका बसला. त्यात आकार, गुणवत्ता व साठवणूक क्षमतेचा अभाव राहिला. असे असताना शेतकऱ्यांनी त्यातील गुणवत्तापूर्ण मालाची प्रतवारी करून साठवणूक केली. मात्र हंगामाच्या अखेर टप्प्यातही दर साधतील, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली आहे.

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार आवारात नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रतिक्विंटल २,५०० रुपये दर मिळत होता. मागणी कमी होऊन पुरवठा मंदावल्याने दर थेट निम्म्यावर आले आहेत. लासलगाव बाजार समितीत एकच सप्ताहाच्या फरकाने सोमवारी (ता. २१) क्विंटलमागे १,००१ रुपयापर्यंत सरासरी दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी (ता. १४) प्रतिक्विंटल २,२०१ रुपये सरासरी दर असताना सप्ताहाच्या सुरुवातीला सोमवारी (ता. २१) प्रतिक्विंटल १४०० रुपये सरासरी दर मिळाला.

शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पडले महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत कांद्याला प्रति किलो 30 रुपये भाव देण्याची मागणी केली.

दर घटण्याची काही कारणे :

-राज्यांत उन्हाळ कांद्याबरोबर खरीप लाल कांद्याची आवक सुरू.

-मध्य प्रदेशात उन्हाळा कांद्याचा अद्याप साठा काही प्रमाणात शिल्लक.

-महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक व गुजरात राज्यांत खरीप हंगामातील नव्या मालाची आवक.

-बांगलादेश, श्रीलंका या प्रमुख आयातदार देशांत पुरवठा कमी

 

 

error: Content is protected !!