Onion Rate : नाफेडकडून होणार ‘इतक्या’ कांद्याची विक्री; बाजारभाव नियंत्रणासाठी सरकारने उचलले पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Rate : कांद्याच्या वाढत्या दराचा कल पाहून केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर साठ्यामधून ३ लाख मेट्रिक टन कांदा विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय केंद्रिय ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक संघाच्या (एनसीसीएफच्या) माध्यमातून कांदा बाजारात येणार आहे. कांद्याच्या किमती रोखण्यासाठी भारत सरकार किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याचा बफर साठा करत असते.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

विक्रीसाठीची कार्यपद्धती निश्चित

ग्राहक व्यवहार विभागाने यावर्षी ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरमधून साठा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. DOCA चे सचिव रोहित कुमार सिंग यांनी १० ऑगस्ट रोजी नाफेड आणि NCCF चे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये कांदा विक्रीसाठीची कार्यपद्धती निश्चित केली आहे.

ई-लिलाव, ई-कॉमर्सद्वारेही विक्री

ज्या राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कांद्याच्या किरकोळ किंमती या देशपातळीवरील किंमतीच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत, अशी राज्ये व केंद्रशासित प्रदेशात प्रमुख बाजारपेठांना लक्ष्य करून कांद्याचा साठा विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी महिन्याच्या व वर्षाच्या तुलनेत किंमतीत वाढ होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे, त्या ठिकाणी ई-लिलावाच्या माध्यमातून कांद्याची विक्री करणे तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किरकोळ विक्री करण्याचे मार्ग शोधले जात आहेत.

ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दर आणि उपलब्धतेच्या प्रमाण तसेच विक्री करण्याची गती देखील ठरविली जाईल. बाजारांमधील विक्रीव्यतिरिक्त राज्यांना त्यांच्या ग्राहक सहकारी संस्था आणि महामंडळाच्या विक्री केंद्राद्वारे कांद्याची विक्री करता यावी, यासाठी सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी

चालू वर्षात बफरसाठी एकूण ३ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली असून, परिस्थितीनुसार मागणी केल्यास त्यात आणखी वाढ होऊ शकते. दोन केंद्रीय नोडल एजन्सी, उदा., NAFED आणि NCCF यांनी जून आणि जुलैमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून १.५० लाख मेट्रिक टन रब्बी कांद्याची खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी, कांद्याचा तुटवडा कमी करण्याच्या उद्देशाने भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) च्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर कांद्याचे विकिरण देखील सुरू करण्यात आले होते. सुमारे १,००० मेट्रिक टन कांदा विकिरणित आणि नियंत्रित वातावरणात साठवण्यात आला आहे.

शेतमाल : कांदा (Onion Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/08/2023
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13140020001700
वाईलोकलक्विंटल1580020001500
11/08/2023
कोल्हापूरक्विंटल3154100025001600
अकोलाक्विंटल210120020001800
चंद्रपूर – गंजवडक्विंटल575150032002100
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल9678100021001550
खेड-चाकणक्विंटल15090020001400
दौंड-केडगावक्विंटल232575025001900
राहताक्विंटल1051670031002000
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल2260019001200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10796110027501900
सोलापूरलालक्विंटल815010031001300
धुळेलालक्विंटल81115020001500
जळगावलालक्विंटल45250019371252
उस्मानाबादलालक्विंटल17120022001700
साक्रीलालक्विंटल3040100025001900
यावललालक्विंटल30095014201225
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल31870032001950
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल135150023001400
पुणेलोकलक्विंटल1072190021001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल12100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1870016001100
पुणे-मांजरीलोकलक्विंटल121110022001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल44280015001150
वाईलोकलक्विंटल2570018001200
मंगळवेढालोकलक्विंटल3770019001600
कल्याणनं. १क्विंटल3200021002050
येवलाउन्हाळीक्विंटल1300050025002200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल600050026272300
नाशिकउन्हाळीक्विंटल380560025511800
लासलगावउन्हाळीक्विंटल1300090024522200
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल361070023532150
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल21500150027522400
सिन्नरउन्हाळीक्विंटल223030024502250
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल70150027002300
चांदवडउन्हाळीक्विंटल11000140026012260
मनमाडउन्हाळीक्विंटल460050025012100
सटाणाउन्हाळीक्विंटल1445065027002275
कोपरगावउन्हाळीक्विंटल1378040026002200
कोपरगावउन्हाळीक्विंटल520045024502180
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2400075029512400
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल562050025312100
पारनेरउन्हाळीक्विंटल1022830035001850
भुसावळउन्हाळीक्विंटल195001000800
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल23020025002000
error: Content is protected !!