Onion Rate : कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांच्यात नाराजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Rate : मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या दरावरून शेतकरी नाराज आहेत. मात्र आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता या शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडणार असल्याचे दिसत आहे. कारण की कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार आपल्या बफर स्टॉक मधून तीन लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे

10 ऑगस्ट 2023 रोजी ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी कांद्याच्या वाढत्या दराबद्दल नाफेड आणि एनसीसीएफ च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली. यावेळी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कांदा रडवणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सरकारने घेतला मोठा निर्णय

सध्या ग्राहकांना कांदा तसेच इतर पालेभाज्या खरेदी करण्यासाठी परवडत नाही. त्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये कांदा उपलब्ध व्हावा यासाठी कांद्याच्या किमती आणि कांद्याच्या उपलब्धतेवर कांद्याच्या विक्रीचे प्रमाण आणि गती याची काळजी घेतली जाईल. त्याचबरोबर किरकोळ बाजारामध्ये कांद्याची विक्री करण्याबरोबरच केंद्र सरकार राज्यांना देखील स्वस्त दरात कांदे उपलब्ध करून देणार आ. हे ज्यामुळे ग्राहक सहकारी आणि मंडळाच्या किरकोळ दुकानातून कांदे विकत घेऊ शकतील.

शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

मागच्या काही दिवसापूर्वी कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना चांगलेच रडविले आहे. शेतकऱ्यांनी अक्षरश कवडीमोल दराने आपला कांदा विकला आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या कांद्यात रोटाव्हेटर फिरवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान अनुदानाची घोषणा केली होती. मात्र सरकारने घोषणा केल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर कांद्याचे अनुदान जमा झाले नाही. त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर कांद्याचे अनुदान जमा करावे अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/08/2023
कोल्हापूरक्विंटल5462100026001700
औरंगाबादक्विंटल671830022001250
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल885390024001650
खेड-चाकणक्विंटल200100025001800
सोलापूरलालक्विंटल1243510035001400
धुळेलालक्विंटल301015023001800
जळगावलालक्विंटल58350021371350
उस्मानाबादलालक्विंटल16255028002675
पंढरपूरलालक्विंटल49250032001800
साक्रीलालक्विंटल357080022701800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल515750027001600
पुणेलोकलक्विंटल14764100025001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल14100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल29160026002100
पुणे-मोशीलोकलक्विंटल763100025001700
वाईलोकलक्विंटल15100028001700
कामठीलोकलक्विंटल8120016001400
कल्याणनं. १क्विंटल3240027002550
नागपूरपांढराक्विंटल960240030002850
येवलाउन्हाळीक्विंटल800030024502000
नाशिकउन्हाळीक्विंटल453260026512000
लासलगावउन्हाळीक्विंटल2120080025212280
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल455080024712250
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल22253100024802250
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1800060024422175
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल17104110027001900
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल101820026262250
कळवणउन्हाळीक्विंटल1570060029002350
संगमनेरउन्हाळीक्विंटल633430029651632
चांदवडउन्हाळीक्विंटल1100020024632180
मनमाडउन्हाळीक्विंटल900070024512200
सटाणाउन्हाळीक्विंटल1743555026552150
कोपरगावउन्हाळीक्विंटल648037525752140
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2440070029552350
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल420070024802000
भुसावळउन्हाळीक्विंटल580015001500
वैजापूरउन्हाळीक्विंटल312670027002100
देवळाउन्हाळीक्विंटल735022525552100
error: Content is protected !!