हॅलो कृषी ऑनलाईन: निर्यात बंदी हटवून सुद्धा कांद्याचे दर (Onion Rate) काही वाढतांना दिसत नाही आहेत. त्यातच आज राज्यातील बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) कांद्याची 01 लाख 30 हजार 934 क्विंटल आवक झाली. जाणून घेऊ या वेगवेगळ्या बाजारात कांद्याला मिळालेले दर (Onion Rate).
वेगवेगळ्या बाजार समितीत कांद्याला मिळालेले दर (Onion Rate)
नाशिक (Nashik) जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Summer Onion) 78 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला तर उन्हाळ कांद्याला 1200 रुपयांपासून 1650 रुपयांपर्यंत दर मिळाला.
सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजी नगर बाजार समितीत (Bajar Samiti) 850 रुपये अकोला बाजार समितीत 1200 रुपये कोल्हापूर बाजार समिती 1400 रुपये तर खेड चाकण बाजार समितीत सर्वाधिक 1800 रुपयांचा दर मिळाला.
जुन्नर नारायणगाव बाजार समितीत चिंचवड कांद्याला 1000 रुपये तर कराड बाजार समितीत हलवा कांद्याला 1800 रुपयांचा सरासरी दर मिळाला.
तसेच आज लाल कांद्याला (Red Onion Rate) अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1050 रुपये धुळे बाजार समितीत 1190 रुपये नागपूर बाजार समिती 1375 रुपये साक्री बाजार समिती 1500 रुपये असा दर मिळाला.
लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 1325 रुपये, पुणे पिंपरी बाजार समिती 1350 रुपये असा दर मिळाला. तर शेवगाव बाजार समितीत नंबर एकच्या कांद्याला 1500 रुपयांचा दर मिळाला.
दरम्यान आज उन्हाळ कांद्याला येवला बाजार समितीत 1540 रुपये, नाशिक बाजार समिती 1300 रुपये, लासलगाव बाजार समिती (Lasalgaon Onion Market Rate Today) 1500 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समिती सर्वाधिक 1650 रुपये, राहुरी वांबोरी बाजार समिती 1200 रुपये, चांदवड बाजार समितीत 1540 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 1550 रुपये असा दर मिळाला (Onion Rate).