Onion Subsidy : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! लवकरच मिळणार कांद्याचे अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Subsidy : राज्यात कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने कांदा विकला होता. तर काही शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये शेतातच रोटाव्हेटर देखील फिरवला होता. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले होते. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपये प्रमाणे शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निर्णय घेऊन देखील अनुदान मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. (Onion Subsidy)

कधी मिळणार अनुदान?

आता शेतकऱ्यांच्या याच गोष्टीची दखल पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली असून कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी वित्त विभागाने पणन विभाग 465 कोटी 99 लाख रुपये इतका निधी वितरित केला आहे. अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. लवकरच आता कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. असे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या ठिकाणाहून घ्या अनुदानाचा लाभ?

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कांदा अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक सोपी गोष्ट करायची आहे. तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करायचे आहे. हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कांदा अनुदान कसे मिळवायचे? याबाबत माहिती मिळेल त्याचबरोबर कांदा अनुदान मिळण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? हे देखील तुम्हाला समजेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हॅलो कृषी हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.

याबाबत अधिकची माहिती देताना अब्दुल सत्तार म्हणाले की, कांद्याच्या दरामध्ये झालेल्या अभूतपूर्व घसरणीनंतर शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना सहानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनामध्ये अनुदानाची रक्कम अतिरिक्त करण्याकरता 550 कोटी रुपयांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. यापैकी 465.99 कोटी रुपये इतका निधी वित्त विभागाने पणन विभागात वितरित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच हे अनुदान मिळणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

३० लाखांवर लाभार्थी

शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले. मोठ्या आर्थिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना या अनुदानासाठी अर्ज केले आहेत. कांदा अनुदानासाठी आतापर्यंत जवळपास 30 लाख 36 हजार 476 पात्र लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांची ग्रामपंचायतमध्ये लावण्यात येईल असे देखील अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले आहेत.

error: Content is protected !!