कांद्याला मिळतोय कवडीमोल दर ; शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , सध्याचे बाजारातील कांद्याचे भाव बघता कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कांदा हे हे वर्षभर मागणी असलेले नगदी पीक म्हणून शेतकरी याचे उत्पादन घेत असतात मात्र कांद्याचा दर घसरल्याने करायचे काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

काही दिवसांपूर्वी कांद्याला 3000 ते 3200 रुपये प्रति क्विंटल साठी दर मिळत होता. मात्र हाच दर आता थेट आठशे ते बाराशे रुपयांवर येऊन ठेपला त्यामुळे कांदा ला लागलेला खर्च आणि खते आणि इतर खर्च सुद्धा शेतकऱ्यांना कांद्याच्या विक्रीतून मिळत नाहीये. त्यामुळे आहे त्या किमतीत कांद्याची विक्री करायची आणि मिळेल त्या पैशावर समाधान म्हणायचं किंवा मग कांद्याची साठवणूक करायची आणि नंतर हा कांदा विक्रीस काढायचा असे दोनच पर्याय सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे असल्याचं पाहायला मिळतय. सध्या इतर शेती मला बाबत म्हणजेच सोयाबीन कापसा बद्दल बोलायचं झाल्यास सोयाबीन आणि कापूस हा साठवणूक करून त्याला नंतर चांगली किंमत मिळाल्याचे पाहायला मिळते आहे. कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा अशाच प्रकारचा काहीसा निर्णय घेताना दिसून येत आहेत. आता लहान व रांगडा कांदा पाठोपाठ उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर प्रचंड घसरले आहेत त्यामुळे कांदा विकावा की साठवून ठेवावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता पण त्यांनी यावर उपाय म्हणून आता एक निर्णय घेतल्याचे दिसते कांदा कवडीमोल भावात विकण्यापेक्षा शेतकऱ्यांनी साठवणूक करण्याचा निर्णय घेतलाय.

कांद्याची योग्य साठवणूक महत्वाची
कांद्याची साठवणूक करताना मात्र शेतकऱ्यांनी मोठी काळजी घेतली पाहिजे कारण आता पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे त्यामुळे कांदा वाढवताना कांदा साठवताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं उन्हाळी कांद्याची टिकवणक्षमता खरिपातील कांदा पेक्षा चांगली असते कांदा साठवून ठेवण्यापूर्वी कांद्याला वाढवणं गरजेचं असतं त्यानंतर त्याचा एका ठिकाणी मोठा ढीग न घालता कांद्याची साठवणूक करावी. सडलेले कांदे चांगल्या कांदा मधून वेगवेगळे वेळोवेळी काढत राहावेत ज्यामुळे चांगले कांदे खराब होणार नाहीत.

कांद्याचे ताजे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/04/2022
येवलालालक्विंटल6800200797600
लासलगावलालक्विंटल4550400900700
मनमाडलालक्विंटल1500300841700
भुसावळलालक्विंटल40100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4203001000650
पुणे- खडकीलोकलक्विंटल2290013001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल267001200950
पुणे-मोशीलोकलक्विंटल4083001000650
येवलाउन्हाळीक्विंटल15003001051850
लासलगावउन्हाळीक्विंटल400050011991000
कळवणउन्हाळीक्विंटल180036014001100
मनमाडउन्हाळीक्विंटल5004001069850

Leave a Comment

error: Content is protected !!