हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट घोंघावत आहे. मागील महिन्यातही कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यामुळे आता कांद्याच्या दरात आणि आवकामध्ये मोठी तफावतता पहायला मिळाली आहे. उन्हाळा ऋतू आणि अवकाळी पाऊस हे दोन्ही ऋतू एकत्र आल्याने अजूनच कांद्याचा बाजार उठला आहे.
काटलेला कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाला असून त्याची साठवण देखील अधिक काळ टिकून ठेवता येणार नाही. त्याचप्रमाणे उन्हाळ कांदा जरी साठवला तरीही तो हिवाळ्यात बाजारात विक्रीसाठी आणला जातो. मात्र यंदा निसर्गाने साथ न दिल्याने उन्हाळ कांद्याचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कांद्याच्या पिकासाठी बियाणे आवश्यक असतात. मात्र हेच बियाणे विकत आणण्यासाठी खर्च अधिक लागतो. यासाठी आता शेतकरी घरीच बियाणे तयार करत आहेत. यामुळे पैसा आणि वेळ दोन्हींची बचत होते.
शेतकरी मित्रानो, तुम्हाला कोणत्याही शेतमालाचा रोजचा बाजारभाव चेक करायचा असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील शेतमालाचे बाजारभाव पाहता येतात. यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही हे महत्तवाचे, याशिवाय हॅलो कृषीमध्ये हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा, यांसारख्या अनेक सुविधा मोफतमध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा
येत्या काही दिवसात कांद्यामध्ये कमतरता भासणार असून कांदा जरी बाजारात विक्रीसाठी आणला गेला तर त्या कांद्यात दर वाढ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम शेतकरी आणि ग्राहक यांच्यावर होणार आहे. यामुळे या कांद्यामुळे दोघांच्याही डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. यामुळे कांदा बाजारभावात अधिकच भाव खाऊन जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र कांद्याच्या प्रमाणात घट पहायला मिळणार आहे.
हा कांदा जरी बाजारात आला तरीही कांद्याचा साठा अधिकच कमी होणार असून कांद्याच्या दरात वाढ होईल. यामुळे आता कांद्याची जरी साठवण केली तरी कांदा किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. यामुळे हा कांदा परदेशात आणि बाहेरील राज्यात निर्यात करणे अवघड होऊन बसले आहे. यामुळे आता शेतकरी आणि ग्राहकांच्या डोळ्यात पाणी पहायला मिळतंय. यामुळे आता वर्षभर कांदा पिकाची आवक, दर याबाबत फारसं काही सांगता येणं कठीण होऊन बसलं आहे.