Scheme For Farmers: एकात्मिक कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन!

0
7
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक (Scheme For Farmers) पद्धतीस चालना देऊन शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबवित आहे. एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी (Integrated Cotton Soybean And Other Oilseeds Productivity Enhancement And Value Chain Development) राज्य पुरस्कृत (Maharashtra Government) विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे (Mahadbt Portal) अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department Maharashtra) केले आहे.

ही विशेष कृती योजना (Scheme For Farmers) सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबवण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत तर मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी 23 जून, 2024 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत (Online Application For Scheme).

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा (Scheme For Farmers) लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागा मार्फत करण्यात येत आहे.