आता घरबसल्या वारसनोंद आणि तक्रार अर्ज दाखल करता येणार; महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । शासनाने ऑनलाईन अर्ज आणि तक्रार घेण्यास या ऑनलाईन पद्धतीमध्ये सुरवात केली आहे. जास्तीत जास्त विभाग आता ऑनलाईन आणण्यावर शासनाने भर दिला आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा कागद म्हणजे सातबारा उतारा, फेरफार आणि खाते उताऱ्यापाठोपाठ वारसनोंद! आता घरी बसल्या वारसनोंद आणि तक्रार अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासाठीची सुविधा महसूल विभागाकडून ऑनलइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारपासून म्हणजेच २४ मे पासून राज्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

यापूर्वी तलाठी ऑफिसमध्ये जाऊन वारस नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी जावे लागत होते. आता नागरिकांना त्या कामासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. महसूल विभागाने दिलेल्या ऑनलाईन पर्यायामुळे नागरिक आता ते काम घरी बसून करू शकणार आहेत. त्यासाठी शासनाने ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाभूमी या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. नोंद करण्याची विस्तृत माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अर्ज कसा करायचा?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करायचा असेल तर तुम्ही घरी बसून पैसे खर्च न करता सोप्प्या पद्धतीने अर्ज करू शकता. शिवाय Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज स्वतः चेक करता येतो. तुम्ही तुमची शेतजमीनही याद्वारे मोजू शकता. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही याद्वारे करता येते. यासाठी तुम्हाला आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करायच्या आहेत.

  • तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करा.
  • आता तुमचा मोबाईल नंबर टाकून नाव, वय, आदी गोष्टींची माहिती भरून मोफत मध्ये रजिस्टर करा.
  • आता अँप ओपन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला सरकारी योजना अशी विंडो दिसेल.
  • सरकारी योजना या विंडो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे सरकारच्या सर्व योजनांची लिस्ट दिसेल. यामधील तुम्हाला हव्या त्या योजनेची निवड करा. तिथेच खाली दिलेल्या Appy बटनावर क्लिक करून तुम्ही मोबाइलरूनच योनजेनेल अर्ज करू शकता.

नागरिकांना वारसाची नोंद घेण्यासाठी महाभूमी या संकेतस्थळावर अथवा http://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिंग करून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील. ‘इ-हक्क’ ही प्रणाली देखील बॅंकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे अथवा काढण्यासाठी बॅंकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे. नागरीकांना यातून अनेक फायदे होणार आहेत. हे फायदे म्हणजे, हस्तलिखित वारस नोंदवही आणि तक्रार नोंद वही बंद होणार, या कामासाठी तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करता येणार, फक्त जबाब देण्यासाठीच तलाठी कार्यालयात जावे लागणार, ऑनलाइनमुळे तलाठी स्तरावर पेंडन्सी कळणार, आवश्‍यक कागदपत्रे जोडल्यास पंधरा दिवसांत वारस नोंद, त्यापुढील पंधरा दिवसांत फेरफार नोंद होणार

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!