हॅलो कृषी ऑनलाईन । उष्ण कटिबंधात पिकविल्या जाणाऱ्या जगातील महत्वाच्या फळांमध्ये सीताफळाचा समावेश होतो. थायलंड आणि भारत या दोनच देशात पारंपरिक पद्धतीने उत्पादित होणाऱ्या सीताफळाला जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचे आरोग्यदायी घटक, चव आणि सुगंध या सर्व घटकांमुळे सीताफळ लोकप्रिय आहे. तसेच त्याला सुपर फूड म्हणून देखील ओळखले जाते. थायलंडच्या तुलनेत भारतातील सीताफळ चव आणि सुगंधाच्या बाबतीत सरस आहे. आईस्क्रीम सह इतरही अनेक प्रक्रिया पदार्थांसाठी सीताफळाला चांगली मागणी आहे. तसेच सीताफळाच्या बिया, पाने आणि इतर भागांनाही औषधी गुणधर्मामुळे मोठी मागणी आहे.
देशात सर्वाधिक सीताफळ लागवड महाराष्ट्रात होते. गेल्या पाच वर्षात या पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इतर फळांच्या तुलनेत सीताफळाच्या लागवडीसाठी पाणी आणि व्यवस्थापन खर्च कमी लागतो. बाळानगरी, गोल्डन, सुपर गोल्डन असे वाण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. राज्यातील सिंचन ३० टक्क्यांच्या वर जाऊ शकत नाही. आणि सध्या कमी पाण्यात १९८९ मध्ये राज्य सरकारने कोरडवाहू फळबाग लागवड योजना आणली तेव्हापासून राज्यात फळांच्या पिकाला चालना मिळाली आहे. मात्र सिताफळासाठी अजूनही काम करण्याची गरज आहे. लागवडीच्या प्रक्रिया प्रमाणित करणे, छाटणीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान सोप्या भाषेत मांडणे, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी यंत्रणा उभ्या करणे अशा गोष्टींची गरज आहे.
सिताफळ हे नाशवंत फळ आहे. काढणीनंतर पिकल्यावर ते वेळेत बाजारात पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळे सध्या आपल्याकडे काढणीनंतरचे तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे. पुरंदर भागात पल्प काढण्याच्या काही यंत्रणा विकसित झाल्या असल्या तरी त्यामध्ये दर्जा सुधारण्याचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे. स्वच्छता विचारात घेऊन हा पल्प सुरक्षित हाताळला जाईल याची दक्षता घेणे महत्वाचे आहे.
सध्या महाराष्ट्रातील काही भागात सीताफळाची लागवड होत असली तरी खूप प्रमाणात शेतकऱ्यांना या फळातून चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे सर्वाना योग्य मूल्यभाव मिळावा यासाठी एक सक्षम साखळी तयार होण्याची गरज आहे. जर या फळाकडे इंडस्ट्री फळ म्हणून पाहिले तर याचे अर्थकारणही उत्तम होऊ शकते. भारतातून सीताफळाची १०० टन निर्यात होते. यामध्ये ९७% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आणि एकूणच पल्प साठी २००० टन उत्पादन वापरले जाते. ताजे उत्पादन देशाच्या विविध भागात एका दिवसाच्या कालावधीत कसे पोहोचेल या संदर्भात व्यवस्था उभी करणे देखील महत्वाचे आहे. म्हणजे बाजारपेठ निर्माण होऊ शकेल. आखाती देशांमध्ये विमानाची खर्चिक निर्यात थांबवून ती समुद्रमार्गे करता येईल का याचाही विचार करावा लागेल. पॅकिंग आणि रिफर व्हेईकलच्या माध्यमातून ताजा पल्प लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अशाप्रकारे या संपूर्ण व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात विविध संधी उपलब्ध आहेत.
शेतकरी मित्रांनो हे पण वाचा –
‘या’ औषधी वनस्पतीची शेती एकरात देते 6 लाखापर्यंत उत्पन्न; खर्च केवळ 40 हजार
आपल्याला करोडपती बनवू शकते चंदनाची शेती! मिश्रशेतीचाही चांगला पर्याय; जाणून घ्या संपूर्ण माहिती
तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी कुठे खर्च झाला? एका क्लिक वर कसे जाणून घ्याल
30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये–
ड्रॅगन फ्रुटपासून बनवली वाईन! ‘या’ महिलेने लाँच केला आपला ब्रँड