हॅलो कृषी ऑनलाईन : नागपुरी संत्र्याची चव (Orange Farming) आणि रंगसंगती वाढवणारी नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने हा प्रकल्प राबवण्यासाठी एकूण 9 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात निवडक पद्धतीने नवीन संत्र्याच्या वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. विदर्भातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून निवडक 750 वैशिष्ट्यपूर्ण संत्र्याच्या झाडांपासून कलम गोळा करण्यात आली आहेत. यातून निवडलेल्या “टॉप 10” कलमांची लागवड (Orange Farming) कृषी विद्यापीठच्या प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे. या प्रकल्पातून नवीन, दर्जेदार आणि अधिक चविष्ट अशा संत्र्याची वाण विकसित होण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (Orange Farming Project 9 Crores)
तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने 1990 मध्ये केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूरची स्थापना झाली. मात्र, या संस्थेमधून नागपुरी संत्र्याच्या समतुल्य अशी कोणतीही नवीन जात विकसित (Orange Farming) करता आली नाही. त्यामुळेच आता कृषी विभागाने स्वतः पुढाकार घेऊन निवडक पद्धतीने संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संशोधन प्रकल्पात केवळ निवडक पद्धतीचाच वापर केला जात नाही तर, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मदतीने गॅमा किरणोत्सर्गाचा वापर करूनही नवीन संत्र्याच्या वाणा विकसित केल्या जात आहेत.
नवीन संत्री वाणाचा पर्याय उपलब्ध होणार
परिणामी, नवीन संशोधनातून यशस्वी झाल्यास, नागपुरी संत्र्याची चव, रंग आणि उत्पादकता यात निश्चितच सुधारणा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मिळण्यासह त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. कृषी विद्यापीठाचे डॉ. विनोद राऊत यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पाला सुरुवात झाल्यास आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि निवडक पद्धतीने तयार केलेल्या कलमांची लागवड दीड वर्षापूर्वी करण्यात आली आहे. येत्या काही वर्षांत या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि शेतकऱ्यांना नवीन संत्र्याच्या वाणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.