सेंद्रिय कर्बसाठी जैविक खते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खतांच्या मोठ्या प्रमाणात वापरामुळे आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागल्या. म्हणूनच जैविक शेती आणि जैविक उत्पादने यांचे महत्व आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढले आहे. सध्या मोदी सरकार जैविक शेतीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. तसेच अनेक शेतकरी जैविक शेतीकडे वळताना दिसत आहेत. आजच्या लेखात सेंद्रिय कर्बसाठी आवश्यक जैविक खतांच्या बाबत जाणून घेऊया…

सेंद्रिय (कार्बन) कर्ब म्हणजे काय ?

सेंद्रिय (कार्बन) कर्ब म्हणजे ज्यावेळेस जीवामृत, हिरवळीचे खते, शेन खत, गांडूळ खत, कोंबडी खत, डी कंपोजर, टायकोडर्मा, सुडोमोनास, मायक्रोराझा इ. या गोष्टीचा शेतात वापर होतो त्यावेळेस त्या शेतात जैविक कर्ब प्रमाण वाढते आणि उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक खर्च कमी होतो.

सेंद्रिय कर्बसाठी जैविक खते

– शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, शेळ्या-मेंढ्यांच्या लेंडीचे खत, पिकांपासून मिळणारा भुसा, पीक अवशेष, काडीकचरा, हिरवळीची खते आदी
– हिरव्या सेंद्रिय द्रव्यांमध्ये कर्बोदके आणि प्रथिने यांचे प्रमाण १२ ते १५ टक्क्यापर्यंत
– साधारणतः जमिनीत सेंद्रिय अवस्थेत नत्र ९३ ते ९७ टक्के तर स्फुरद २० ते २८ टक्के असतो.
– गंधकही ९० ते ९७ टक्के सेंद्रिय अवस्थेत असतो.
– जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण उष्ण आणि वाळवंटी प्रदेश यावर अवलंबून असते.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे संवर्धन

– पीक फेरपालटीत कडधान्य पिकांची लागवड करावी.
– पिकांना शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळी आधी जमिनीत मिसळावे.
– क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग पेरुन दीड महिन्यानंतर गाडावा. किंवा उसात आंतरपीक म्हणून घेऊन नंतर गाडावा.
– उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर करावा.
– पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
उदा. खोडवा उसात पाचट
– चोपण जमिनीत सेंद्रिय व रासायनिक भूसुधारकांचा
(उदा. प्रेसमड, जिप्सम) वापर करावा. आम्ल जमिनीत लाईमचा वापर करावा.
– कमीत कमी नांगरट करावी. बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.
– जैविक खतांचा बीजप्रक्रियेद्वारे तसेच शेणखतात मिसळून जास्त वापर करावा.
– सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व खतांचे नियोजन करावे.

मशागत

नांगरणी ही बैलचलीत वा ट्रॅक्टरचलीत उपकरणांच्या साह्याने करण्यात येणारी क्रिया आहे. या क्रियेने माती उकरली जाते व खालची माती वरती येते. जमीन पोकळ होते. त्याद्वारे पिकांच्या मुळांना फैलण्यास वाव मिळतो. पीक जोमाने वाढते. नांगरणीला शेतीचा कणाच म्हटले तर वावगे ठरणार नाही.शक्यतो नांगरणी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात करावी. जेणे करून नांगरणी झालेला मातीचा थर सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे निर्जंतूक होतो. तसेच वरचा सुपीक थर खाली गेल्याने मातीतील सेंद्रिय कर्बाचे ज्वलनही कमी होते.

जैवीक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८

Leave a Comment

error: Content is protected !!