Paddy Purchase: रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीला पुन्हा महिन्याभराची मुदतवाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात धान (Paddy Purchase) आणि भरड धान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे रब्बी हंगामासाठी धान खरेदीची (Rabi Paddy Procurement) मुदत आता पुन्हा वाढविण्यात आली आहे (Paddy Purchase). यामुळे हजारो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) धानाचे उत्पादन (Paddy Cultivation) मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. अशातच रब्बी हंगामातील धानाची विक्री (Paddy), आधारभूत किंमत (MSP) धान खरेदी केंद्रांवर (Paddy Purchasing Center) विक्रीसाठी नोंदणी करणे गरजेचे असतं. या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत 30 एप्रिल पर्यंत होती. मात्र, यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत अजूनही अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या वतीने दिलेली मुदत वाढण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता धान उत्पादक शेतकर्‍यांनी (Farmer) रब्बी हंगामाच्या धान विक्री करिता त्यांची नोंदणी नजीकच्या केंद्रावर करावी, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केलं आहे.

31 मे पर्यंत मुदतवाढ

आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2023-24 अंतर्गत धान अथवा भरड धान्य, मका इत्यादि करिता ऑनलाईन नोंदणीची तारीख ही 30 एप्रिल ठरवण्यात आली होती. मात्र, भंडारा जिल्ह्यामध्ये मागील हंगामाच्या तुलनेत अजूनही ऑनलाईन शेतकरी नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या पत्रानुसार धान, भरडधान्य खरेदी (Paddy Purchase) करिता ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 31 मे 2024 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकर्‍यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी नजिकच्या केंद्रावर जाऊन करावी, तसेच त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की, जमिनीचा ऑनलाईन सातबारा उतारा (चालू हंगामाचा पिक पेरा असलेला), नमुना 8 अ, बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्ययावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर नेऊन तिथे आपली नावे नोंदवावी. जेणेकरून रब्बी पणन हंगामामध्ये धान विक्री करता येईल. शेतकरी बांधवांनी उन्हाळी धान खरेदीसाठी (Paddy Purchase) नजीकच्या शासकिय धान, भरडधान्य खरेदी करणाऱ्या संस्थांकडे कागदपत्र सादर करून धान खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीचा लाभ घेण्यात यावा. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

राईस मिलर्सच्या प्रलंबित मागण्यांमुळे धानाची भरडाई रखडली

भंडारा जिल्ह्याप्रमाणेच गोंदिया जिल्ह्यात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची (Paddy) शेती करतात. शासनाच्या वतीने आदिवासी बहुल भागात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शेतकर्‍यांकडून धान खरेदी केला जातो. मात्र, आदिवासी महामंडळाचे गोडाऊन नसल्याने खरेदी केलेला धान ताडपत्रीचा आधार घेत मोकळ्या जागेवर ठेवण्यात येते. यावर्षी राईस मिलर्सच्या (Rice Millers Association) विविध मागण्या प्रलंबित असल्याने धानाची उचल न केल्याने गेल्या 4 महिन्यांपासून हा धान उघड्यावर तसाच पडून आहे. यावर्षी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) गोंदिया (Gondia District) जिल्ह्याला झोडपून काढल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या गावातील खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाला (Paddy Purchase) अंकुर फुटल्याने केंद्र चालकांचे नुकसान झाले आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.