Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 6 दिवस राज्यात हवामान कसे राहणार? पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच आता काही ठिकाणी उन्हाच्या झळांनी नकोसं केलं आहे. वातावरणातील उकाडा वाढत असून अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे शेतकरी विचलित होतो आहे. यामुळे राज्यातील हवामान हे कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशी परीस्थिती पहायला मिळते आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच आपला नवीन हवामान अंदाज सांगितलं असून पुढील ६ दिवस राज्यात हवामान कसे राहील याची माहिती दिली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

आज (ता.१०) मे या दिवशी मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. तर दुसरीकडे जळगाव,अकोला,वर्धा या भागात तापमान चाळीशी पार गेले आहे. यामुळे या ठिकाणी हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान खात्याने (Weather Dept) वर्तवला आहे. तसेच उद्यापासून म्हणजेच ११ मे पासून ते १६ मे पर्यंत राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणभागात हवामान कोरडे राहणार असून या भागातील नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्या गावात ऊन पडणार की पाऊस १ मिनिटात जाणून घ्या

शेतकरी मित्रांनो, राज्यात हवामान कधी कोरडे पहायला मिळत आहे तर कधी अवकाळी पावसाची शक्यता पहायला मिळते. यामुळे हवामान अंदाजानुसार तुमच्या गावात पाऊस असेल की, ऊन असेल हे जाणून घेणं आता सोयीचं झालं आहे. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करायाचं आहे. यानंतर हे ॲप इंस्टॉल करून हवामान अंदाज या पर्यायावर क्लिक करून आपल्याला आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेणं सोपं झालं आहे. तसेच पशुपालन, सरकारी योजना, जमीन मोजणी, सातबारा उतारा, शेतीमाल थेट खरेदी – विक्री आदी सेवांचा लाभ घेण्यासाठी Hello Krushi हे ॲप आजच तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या.

https://youtu.be/bO_MkPztn3w

या भागात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी (Panjabrao Dakh Havaman Andaj)

राज्यातील अवकाळी पाऊस हा आज मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात सातारा, सांगली, कोल्हापूर भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केले आहे. मात्र उद्यापासून ११ मे ते १६ मे पर्यंत या भागात उन्हाच्या झळांचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागणार आहे.

१० मे ते १६ मे हवामान कोरडे राहणार

१० मे पासून ते १६ मेपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याने पुन्हा वातावरणात बदल होण्याची चिन्हे दिसत असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी लावला आहे. १० मे पासून ते १६ मे पर्यंत अवकाळी पाऊस नसल्याने हवामान कोरडे राहणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी काढणी करून घ्यावी

राज्यात १६ मे पर्यंत पाऊस होणार नसल्याने काढणीला आलेले कांदा, ज्वारी, भुईमूग हे पीक शेतकऱ्यांनी काढून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर शेतकऱ्यांनी अजून काढणी केली नसेल तर हवामान कोरडे आहे तोवर काढणीची कामे उरकल्यास नुकसान टाळता येईल. तसेच उन्हाच्या झळांसह उकाड्यात देखील वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

error: Content is protected !!