Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे; विजा, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटही होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली आहे. हवामान विभागानेही २३ एप्रिल पासून ३० एप्रिल दरम्यान पुन्हा पाऊसाची शक्यता वर्तवली होती. आता आज पासून पुढील ४ दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. पुढील ४८ तासात राज्यातील काही भागात विजा, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटही होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आज (ता.२७) या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस, विजा आणि गारपीट होण्याची संभावना पंजाबराव डख यांनी सांगितली आहे. हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर १५ मे नंतर थोड्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर,पुणे तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात गारपीट होणार असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी झाडाच्या खाली उभे राहू असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपली गुरे शेतात न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावीत असंही सांगण्यात आले आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

तुमच्या गावात किती दिवस पाऊस पडणार?

राज्यात सध्या अवकाळी पाऊस धिंगाणा घालत आहे. कोणत्या भागात किंवा गावात अवकाळी पाऊस कधी सुरू होईल हे जाणून घेणे आता सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello krushi नावाचे मोबाईल ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या गावातील अचूक हवामान अंदाज समजतो. तसेच आपल्याला आपल्या गावात ऊन, वारा, पाऊस अशा वातावरणाबद्दल माहिती मिळवता येऊ शकते. तसेच शेतकरी दुकान, सातबारा उतारा, जमीन मोजणी, भूनकाशा अशा अनेक बाबी एकही रुपये खर्च न करता त्यांचा लाभ घेता येतो तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करा.

या भागात येलो अलर्ट

कोंकण विभागात रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रात धुळे, सातारा, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आले.

मराठवाड्यात जालना, धाराशिव, बीड, लातूर, संभाजीनगर या भागातही अवकाळी पावसाचे प्रमाण आहे. विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आले. तसेच इतर काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. Panjabrao Dakh Havaman Andaj

या भागात ऑरेंज अलर्ट जारी

नाशिक, नगर, हिंगोली, परभणी, नांदेड या भागात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.

error: Content is protected !!