Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 2-3 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस होणार; 30-40 kmph वेगाने वारे, गारपिटीची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) | राज्यात अनेक भागात आज मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस झाला. यानंतर आता पुढील २-३ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत 30-40 kmph वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभाग, मुंबई (IMD) यांनी याबाबत महत्वाची सूचना जारी केली असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

सातारा, सोलापूर, रायगड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, बीड, पुणे, हिंगोली, अहमदनगर या जिल्ह्यांत पुढील २-३ तासांत वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता सांगण्यात आली आहे. हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी ट्विट करून हवामानाचा ताजा अपडेट दिला आहे. सकाळी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. आता दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वादळी वारे वाहू लागले आहे.

विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. ठाणे, अहमदनगर, हिंगोली, जालना, पुणे येथे पावसाचा इशारा कायम असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव येथे काही भागात दुपारी गारपीट झाली असून यामुळे केळीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

तुमच्या गावात पाऊस होणार का ते असं केले 1 मिनिटांत चेक

शेतकरी मित्रांनो वातावरणात कधी ऊन तर कधी पावसाचे पहायला मिळतो. यामुळे वातावरणात रोज बदल जाणवतो. आता आपल्याला स्वतःच्या आपल्या गावात पाऊस होणार का हे जाणून घेणं सोयीचं झालं आहे. यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. हॅलो कृषी अँपवर तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना, शेतमाल थेट खरेदी विक्री अशा बाबीचा आता एकही रुपये खर्च न करता लाभ घेता येतो.

पुढील २-३ तासांत कोणत्या जिल्ह्यांत पाऊसाची शक्यता आहे?
सातारा
सोलापूर
रायगड
उस्मानाबाद
लातूर

परभणी
जालना
बीड
पुणे
हिंगोली
अहमदनगर

error: Content is protected !!