Panjabrav Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 10 दिवस पावसाळ्या सारखा पाऊस कोसळणार; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrav Dakh Havaman Andaj) : महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान केले. आता पुढील १० दिवस राज्यात पावसाळ्याप्रमाणे पाऊस कोसळणार असून शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क राहावे असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दि. 24 एप्रील ते 2 मे दरम्यान राज्यात वादळी वारे अन मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान सर्वानी विजा, गारपीठ, वारे ,स्वताचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाब डख यांनी केले आहे.

तुमच्या गावात पाऊस होणार का कसे जाणून घ्याल?

आपल्या गावात पाऊस पडणार आहे का हे जर आपल्याला अगोदरच अचूक समजले तर त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन हॅलो कृषी या मोबाईल अँप तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज सांगू शकणारी सुविधा सुरु केली आहे. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचे आहे. त्यानंतर Hello Krushi हे अँप मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतर हवामान अंदाज या विभागात तुम्हाला तुमच्या गावातील पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज समजतो. यासोबत सरकारी योजना, सातबारा उतारा, जमीन मोजणी, शेतकरी दुकानाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अशा अनेक सेवा मोफत दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी व्हा.

https://youtu.be/m2_3FlDRyKk

पंजाब डख यांची पूर्व-सुचना काय आहे?

राज्यातील सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे या दहा दिवसांमध्ये सतर्क राहावे. विजा, वारे, पाउस, गारपिठ या पासून स्वःतची तसेच आपल्याकडील पाळीव प्राणी यांची काळजी घ्यावी. सोबत हळद व इतर पिके यांची काळजी घ्यावी. 24 एप्रील पासून राज्यात हवामान बदलत असून 2 मे पर्यंत राज्यात पाउस पडणार आहे. Panjabrav Dakh Havaman Andaj

पूर्वविदर्भ – दि २१, 22, 23, 24, 25, 26, 28, 29 तुरळक भागात दररोज पाउस होण्याची शक्यता. काही ठिकाणी वारा तर कुठे गारपिठ असेल.

उत्तर महाराष्ट्र – दि .22, 26, २७, 28, 29, 30 या तारखेत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भगात गारपिठ तर कुठे पाउस पडेल.

मराठवाडा – दि . 25,26,28,29, 30 या तारखेत काही ठिकाणी गारपिठ, वारा, विजा, पाउस असेल.

दक्षिण व प. महाराष्टू – दि .26, 27, 28, 29, 30 दरम्याण काही ठिकाणी गारपिठ वारे विजा पाउस असेल.

प विदर्भ – दि .25, 26, 26, 28, 29, 30 या तारखेत काही भागात गारपिठ तर कुठे वारे, कुठे पाउस असेल.

error: Content is protected !!