शेंगदाणा दर शंभरी पार! लागवडीचे क्षेत्र घटल्याने वाढला रेट, सर्वसामान्यांच्या खिशाला झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेंगदाणा (Peanut) हा वर्षभर वापरात येणारा एक महत्वाचा खाद्यपदार्थ आहे. भारतात शेंगदाण्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतू यंदा शेंगदाणा लागवडीचे (Peanut Farming) क्षेत्र कमी झाल्याने शेंगदाणा दर गगनाला भिडले आहेत. राज्यात साधारण 120 रुपये ते 140 रुपये किलो या दराने शेंगदानाची विक्री चालू आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झटका लागला आहे.

राज्यातील शेंगदाणा लागवडीचे क्षेत्र कमी झाल्यामुळे शेंगदाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी मागणी अधिक अन आवक कमी राहिल्याने शेंगदाण्याचे दर शंभरी पार गेले आहेत. शेतकर्यांपेक्षा व्यापारी वर्गाला याचा अधिक फायदा मिळत आहे. शेंगादाण्याला महाराष्ट्रात वर्षभर मागणी असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात शेंगदाण्याची विक्री करून ठेवतात. गणपती, मकर संक्रांत, दिवाळी या सणांच्या काळात शेंगदाणा मागणी वाढते. दिवाळी नंतर शेंगदाणा मागणी कमी होत असते. परंतु यावेळी शेंगदाणा आवक घातल्याने दर वाढतच असल्याने दिसत आहे.

असा घ्या थेट शेतकऱ्यांकडून गहू, तांदूळ, शेंगदाणा, भाजीपाला, फळं

आता शेतकऱ्यांकडून कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतमाल खरेदी करणे शक्य झाले आहे. Hello Krushi या मोबाईल अँप च्या मदतीने लाखो शेतकरी आपला शेतमाल थेट ग्राहकाला विक्री करत आहेत. येथे तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळील शेतकर्त्यांचा विक्रीसाठी उपलब्ध असलेला शेतमाल दिसतो. तुम्ही अँपवरून थेट सदर शेतकऱ्याला फोन करून Online ऑर्डर देऊ शकता. यामुळे चांगल्या दर्जाचे अन्न आपल्याला कमी किमतीत मिळते. तसेच यामुळे शेतकरी राजाला अधिक फायदा मिळतो. आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करा.

पुढील काही दिवस शेंगदाण्याचे दर वाढतच राहणार?

शेंगदाण्यांचा वापर रोज केला जात असल्याने त्याची मागणी अधिक आहे. मात्र राज्यातील शेंगदाणा उत्पादनात घट झाली असल्यामुळे बाहेर राज्यांतून येणाऱ्या शेंगदाण्यांवर आपल्याला अवलंबून राहावे लागत आहे. महाराष्ट्रात खास करून गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतून शेंगदाणा येतो. परंतु येथील शेंगदाणा हायब्रीड असतो. दक्षिणेतील राज्यांमधून महाराष्ट्रात शेंगदाणा येत नाही. कारण तेथील शेतकरी दक्षिणेकडील राज्यांमध्येच आपला माल विकणे पसंद करतात. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारात शेंदण्याची आवक कमी राहून दर असेच वाढत राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेंगदाणा तेलाच्या किमतीत वाढ होणार?

शेंगदाणा तेल (Peanut Oil) बनवणाऱ्या कंपन्यांमधून शेंगदाण्याचा मोठी मागणी असते. परंतु शेंगदाणा आवक कमी झाल्याने तेथील कमतरता भासू लागली आहे. तसेच अलीकडच्या काळात शेंगदाणा तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेंगदाणा तेल महाग होण्याची शक्यता आहे.

किरकोळ बाजारात एक किलो शेंगदाण्याचे दर

  • जाडा शेंगदाणा – १२० ते १२५ रुपये
  • जी टेन शेंगदाणा – ११५ ते १२० रुपये
  • घुंगरु शेंगदाणा – ११० ते १३० रुपये
  • स्पॅनिश – १३० ते १४० रुपये

शेतमाल : शेंगदाणे (Peanut Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/01/2023
मुंबईलोकलक्विंटल642100001350012500
17/01/2023
पुणेघुंगरुक्विंटल492100001160010800
कल्याणहायब्रीडक्विंटल3800096008800
मुंबईलोकलक्विंटल1230100001350012500
16/01/2023
पुणेघुंगरुक्विंटल496101001180010950
मुंबईलोकलक्विंटल1564100001350012500
error: Content is protected !!