Phule Triveni Cow : ‘ही’ गाय पाळाल तर मिळेल सर्वात जास्त दूध; माहिती अन किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीला जोडधंदा (Agriculture Business) म्हणून अनेक शेतकरी सध्या गोपालन (Cow Farming) करत आहेत. चांगल्या जातीच्या गायी घेऊन जर व्यवस्थित नियोजन करत गोपालन केले तर शेतकरी नक्कीच फायद्यात राहू शकतो. मात्र बऱ्याचवेळा कोणती गाय सर्वात फायदेशीर (Profit) राहू शकेल हे शेतकऱ्याला लक्षात येत नाही. आज आम्ही तुम्हाला सर्वात अधिक दूध देणाऱ्या फुले त्रिवेणी गाय (Phule Triveni Cow) बाबत माहिती सांगणार आहोत.

त्यापूर्वी अजून एक अतिशय महत्वाची अन शेतकऱ्यांच्या फायद्याची बाब आम्ही तुम्हाला देणार आहोत. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जनावरे खरेदी किंवा विक्री करायची असतील तर तुम्ही कोणत्याही मध्यस्थाशिवाय Hello Krushi मोबाईल अँप च्या साहाय्याने अगदी सहजपणे करू शकता. तसेच इथे तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळील जनावरांच्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचीही सुविधा आहे. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा अशा अनेक गोष्टी करता येतात. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

आता आपण फुले त्रिवेणी गाय बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. फुले त्रिवेणी गाय महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्पावर विकसित केलेली आहे. सर्वसाधारण उपलब्ध संकरित गायीमधील वेगवेगळ्या गुणदोषांचा विचार करून त्यातील दोष कमी करून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अशी फुले त्रिवेणी गाय खास शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. (Phule Triveni Cow) ही गाय होलस्टेन फ्रीजियन ५० टक्के, जर्सी २५ टक्के व गीर २५ टक्के या जातींचा संकर आहे. त्यामुळे अधिक दूध उत्पादन (Milk Production), अधिक स्निग्धांश (Fat) व उत्तम रोग प्रतिकारक क्षमता यांचा त्रिवेणी संगम या तिहेरी संकरित जातीत साधला आहे.

फुले त्रिवेणी गायीची वैशिष्ठे (Phule Triveni Cow)

  • या जातीचे विताचे सरासरी उत्पादन ३००० ते ३५०० लिटर असून दुधातील सिद्धांशाचे प्रमाण ३.८ ते ४.२ टक्के आहे.
  • या गायीची रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली आहे या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या पुढील पिढ्यांची दुग्धोतेपादन क्षमता ही मूळ पिढ्या एवढीच जवळपास कायम राखली जाते.असे संशोधनाअंती आढळून आले आहे.
  • शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा या गायीनी सर्वसाधारणपणे चांगली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
  • फुले त्रिवेणी वळूची गोठीत वीर्य गो संशोधन व विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

जास्त दुध देण्याची क्षमता असणाऱ्या फुले त्रिवेणी या गायीच्या व्यवस्थापनामध्ये संतुलित आणि सकस चारा, खाद्य, क्षाराचे प्रमाण व पिण्यासाठी भरपूर आणि स्वच्छ शुद्ध पाणी,इ. बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. याशिवाय अद्ययावत गोठे, शारीरिक स्वच्छता, रोग नियंत्रणासाठी लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, हाताळण्याची आणि पाळण्याची पद्धत अशा अनेक व्यवस्थापनाकडे बारकाईने लक्ष दिल्यास फुले त्रिवेणी गाय दुग्ध व्यवसायासाठी इतर जातीपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे.

error: Content is protected !!