Pik Vima 2023 : पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचे नुकसान, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे पैसे; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिके जळून देखील गेली आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यात देखील पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी समोर आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी पिक विमा योजनेअंतर्गत विम्याची अग्रीम र१क्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परभणी जिल्ह्यातल्या ज्या महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा पावसाचा जास्त खंड पडला होता त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा करण्याचे निर्देश आयसीआयसीआयलोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले असल्याची माहिती मिळत आहे. या महसूल मंडळातील विमाधारकांना नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम खात्यात जमा करावी लागणार आहे. माहितीनुसार परभणी तालुक्यातील दैठणा, पूर्णा तालुक्यातील लिमला , ताडकळस, मानवत तालुक्यातील केकर जवळा तर जिंतूर तालुक्यातील जिंतूर, पाथरी तालुक्यातील पाथरी, बाभळगाव, पालममधील पेठ शिवणी, रावराजुर, सेलु तालुक्यातील सेलू या महसूल मंडळाचा समावेश आहे.

सध्या राज्यभर पावसाने दडी मारली आहे. राज्यातल्याबहुतांश भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परभणी नंतर आता इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कधी असा निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक शेतकऱ्यांना मदतीची आशा लागली आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी मिळेल पिक विम्याबाबत सविस्तर माहिती

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पिक विम्या संबंधित कोणतीही अडचण असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या एक मिनिटात माहिती मिळू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागेल. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पिक विमा संबंधित त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीच्या योजना संबंधित सर्व माहिती या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!